खटाव येथे खांबावर विजेचा धक्का लागून कंत्राटी वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:29 IST2021-01-08T05:29:00+5:302021-01-08T05:29:00+5:30

खटाव येथील परीट वस्तीवर वीजपुरवठा खंडित असल्याने श्रीशैल शिंगाडे दुरुस्तीसाठी दुपारी चार वाजता ट्रॉन्सफॉर्मवर चढले होते. लिंगनूर ...

Contract power worker dies after being electrocuted at Khatav | खटाव येथे खांबावर विजेचा धक्का लागून कंत्राटी वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू

खटाव येथे खांबावर विजेचा धक्का लागून कंत्राटी वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू

खटाव येथील परीट वस्तीवर वीजपुरवठा खंडित असल्याने श्रीशैल शिंगाडे दुरुस्तीसाठी दुपारी चार वाजता ट्रॉन्सफॉर्मवर चढले होते. लिंगनूर येथील विद्युत उपकेंद्रातून वीजपुरवठा बंद केला नसल्याने शिंगाडे यांचा विजेचा जाेरदार झटका बसल्याने खांबावरच त्यांचा मृत्यू झाला. श्रीशैल यांना विजेचा धक्का बसल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी आरडाओरडा केला. ग्रामस्थांनी लिंगनूर येथील महावितरण कार्यालयात वीजपुरवठा बंद करण्याचे फोन करून प्रयत्न केले. मात्र दूरध्वनी बंद असल्याने अर्धा तास वीजपुरवठा सुरूच राहिल्याने मृतदेह खांबावरच लटकत होता. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. श्रीशैल शिंगाडे यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, सहा महिन्यांचा मुलगा, वृद्ध आई, वडील असा परिवार आहे. घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यांत आला आहे.

फाेटाे : ०६ श्रीशैल शिंगाडे

Web Title: Contract power worker dies after being electrocuted at Khatav