शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

सांगली जिल्ह्यातील संघांच्या पिशवीबंद दुधाचा खप निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 11:18 AM

शिराळा तालुक्यातील प्रचिती दूध संघाचे गाय दुधाचे ८००० लिटर, तर म्हैस दुधाचे २४ हजार लिटरचे संकलन होते. दोन महिन्यात या संघाला २ कोटी ७५ लाख रुपयांचा तोटा सोसावा लागला आहे.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : मुंबई, पुण्यातील आऊटगोर्इंचाही परिणाम

जितेंद्र येवलेइस्लामपूर : सांगली जिल्ह्यातील सहकारी तसेच खासगी दूध संघांना यावर्षी कोरोना संसर्गामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. मार्चपासून कोरोनाचे सावट, हॉटेल्स, मिठाईची दुकाने बंद, मेच्या मध्यंतरात झालेले परप्रांतीयांचे आऊटगोर्इंग यामुळे तीन महिन्यात पिशवीबंद दुधाची विक्री निम्म्याने कमी झाली आहे.

जिल्ह्यात वसंतदादा, राजारामबापू, शेतकरी, सोनहिरा, प्रचिती, हुतात्मा या सहकारी संघांसह १७ मल्टिस्टेट, तर १४ खासगी दूध संघ आहेत. या दूध संघांचे बहुतांशी पिशवीबंद दूध पुणे आणि मुंबईच्या बाजारपेठेत वितरित होते. मुंबई आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणात कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत

त्यामुळे दुधाची मागणी असूनही तेथे पुरवठा करता येऊ शकला नाही. परप्रांतीय तसेच नोकरीनिमित्त मुंबई, पुण्यातून गावी परतण्यासाठी इच्छुक असलेल्यांना शासनाने सशर्त परवानगी दिली. या आऊटगोर्इंगमुळेही पिशवीबंद दूध मागणीघटली.

राजारामबापू दूध संघाचे गाय आणि म्हैस असे मिळून जिल्ह्यात सर्वाधिक दोन लाख लिटर दुधाचे संकलन होते. मुंबई, पुणे व कोकणात सव्वा लाख लिटर पिशवीबंद दुधाची विक्री होत होती. तीन महिन्यात ही मागणी ४५ हजार लिटरवर गेल्याचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी स्पष्ट केले.

शिराळा तालुक्यातील प्रचिती दूध संघाचे गाय दुधाचे ८००० लिटर, तर म्हैस दुधाचे २४ हजार लिटरचे संकलन होते. दोन महिन्यात या संघाला २ कोटी ७५ लाख रुपयांचा तोटा सोसावा लागला आहे. यशवंत दूध संघात गाय दुधाचे ७००० लिटर आणि म्हैस दुधाचे ३० हजार लिटर संकलन होते. दोन महिन्यात ३ कोटी ३२ लाख रुपयांचा तोटा सोसावा लागल्याचे येथील व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

 

दूध विक्रीमध्ये ४0 टक्के फरक पडला आहे. थोटे डेअरीमार्फत सॅनिटायझिंग करून दूध व दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांर्पंत पोहोचवत आहोत. लॉकडाऊन शिथिल झाल्याने आता दुधासह इतर उत्पादनांच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे.- शीतल थोटे, संचालक, जे. डी  थोटे डेअरीज् आष्टा.

 

 

पुणे, मुंबईतील पिशवीबंद दुधाच्या वितरणावर परिणाम झाला आहे. हॉटेल्स, स्वीट मार्ट, चहागाडे बंद आहेत. घरगुती दूध विक्री३0 टक्क्यावर आली आहे. दैनंदिन ७0 हजार लिटर संकलन होते. सध्या २0 हजार लिटर दुधाचीच विक्री होत आहे. ५0 हजार लिटर दुधापासून पावडर व बटर बनविले जात आहे. परंतु त्यालाही मागणी नसल्याने दूध खरेदीत लिटरमागे ९ ते १0 रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.- गौरव नायकवडी, अध्यक्ष, हुतात्मा दूध संघ वाळवा.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाSangliसांगली