शिराळ्यात तोरणा ओढ्यालगत संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:18 IST2021-01-01T04:18:54+5:302021-01-01T04:18:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : येथील दत्त मंदिर ते मुलाणी गल्लीपर्यंत तोरणा ओढ्यालागत १६.४१ लाख रुपये खर्चाच्या आरसीसी संरक्षक ...

Construction of protective wall near Torana stream in Shirala begins | शिराळ्यात तोरणा ओढ्यालगत संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू

शिराळ्यात तोरणा ओढ्यालगत संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : येथील दत्त मंदिर ते मुलाणी गल्लीपर्यंत तोरणा ओढ्यालागत १६.४१ लाख रुपये खर्चाच्या आरसीसी संरक्षक भिंत बांधकामाचा प्रारंभ आमदार मानसिंगराव नाईक यांच्याहस्ते झाला. नगराध्यक्षा सौ. सुनीता निकम, ''विश्वास''चे संचालक विश्वास कदम, संजय गांधी योजनेचे तालुकाध्यक्ष संपतराव शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

नगरसेवक संजय हिरवडेकर यांनी स्वागत केले. नगरपंचायतीमार्फत मान्यवरांचा सत्कार झाला. या कामासाठी नगरपंचायत निधीतून १६ लाख ४१ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती नगराध्यक्षा सौ. निकम यांनी दिली.

यावेळी नगरसेवक किर्तीकुमार पाटील, सुनंदा सोनटक्के, मोहन जिरंगे उपस्थित होते. संतोष देशपांडे यांनी आभार मानले.

Web Title: Construction of protective wall near Torana stream in Shirala begins