कुपवाडमध्ये लोकसहभागातून कोविड आयसोलेशन सेंटरची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:27 IST2021-05-19T04:27:41+5:302021-05-19T04:27:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कुपवाड : शहरातील कुपवाड शहर व परिसर संघर्ष समिती आणि कुपवाड शहर व्यापारी संघटना यांच्या पुढाकाराने ...

Construction of Kovid Isolation Center at Kupwad through public participation | कुपवाडमध्ये लोकसहभागातून कोविड आयसोलेशन सेंटरची उभारणी

कुपवाडमध्ये लोकसहभागातून कोविड आयसोलेशन सेंटरची उभारणी

लोकमत न्यूज नेटवर्क

कुपवाड : शहरातील कुपवाड शहर व परिसर संघर्ष समिती आणि कुपवाड शहर व्यापारी संघटना यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेमध्ये २५ बेडच्या मोफत कोविड आयसोलेशन सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. या सेंटरची महापालिकेचे आयुक्त नितीन कापडनीस यांनी मंगळवारी पाहणी केली.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांची हेळसांड होऊ नये, म्हणून येथील मुख्य रस्त्यालगत जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत या कोविड आयसोलेशन सेंटरची उभारणी केली आहे. हे सेंटर बुधवारपासून रुग्णसेवेत दाखल होणार आहे. या सेंटरची महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी मंगळवारी भेट देऊन माहिती घेतली. या समाजसेवी उपक्रमाचे आयुक्तांनी कौतुक केले.

यावेळी माजी आमदार प्रा. शरद पाटील, साहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड, संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोतरे, नगरसेवक विष्णू माने, अभिजित भोसले, शेडजी मोहिते, मुश्ताकअली रंगरेज, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमर दीडवळ, उपाध्यक्ष बीरू आस्की, माजी अध्यक्ष विजय खोत, प्रवीण कोकरे, अनिल कवठेकर, महावीर खोत, राजेंद्र पवार, विलास माळी, प्रकाश व्हनकडे, मोहनसिंग रजपूत, जितेंद्र कुंभार, विठ्ठल संकपाळ, अमोल कदम, श्रीकृष्ण कोकरे, महेश निर्मळे, स्वप्निल खोत, अभिजित कोल्हापुरे, प्रकाश पाटील, रमेश भानुशाली, सुनील भोसले, रूपेश मोकाशी, रमेश जाधव, आदी उपस्थित होते.

Web Title: Construction of Kovid Isolation Center at Kupwad through public participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.