शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका बिनविरोध करून उमेदवारांना नाकारण्याचा घटनात्मक हक्क डावलला, तरतुदीत बदलाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 17:31 IST

सांगलीतील नारायण मराठे यांचा राज्य निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा, नोटाच्या तरतुदीतही दुरुस्तीची मागणी

सांगली : बिनविरोध निवडणुकीमुळे मतदारांचा सर्व उमेदवारांना नाकारण्याचा मतदानाचा घटनात्मक हक्क हिरावून घेतला जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने २०१८ मध्ये हा आदेश जारी केला असून त्यामध्ये दुरुस्तीची मागणी सांगलीतील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि निवडणूक प्रक्रियेचे अभ्यासक प्रा. नारायण मराठे यांनी आयोगाकडे केली आहे.प्रा. मराठे यांनी सन २०१८पासून यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. यावर्षीही नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाला फेरविचारासाठी स्मरणपत्र पाठविले आहे. यंदा महाराष्ट्रभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत बिनविरोध निवडीचा मुद्दा चर्चेत आला. सोलापूर जिल्ह्यात अनगर नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक बिनविरोध झाली. पण, त्यावरूनही बरेच वादंग झाले. त्याच धर्तीवर सांगलीतील प्रा. मराठे यांनीही बिनविरोध प्रक्रियेच्या फेरविचाराची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आदेशात नमूद केल्याप्रमाणे नोटाला काल्पनिक उमेदवाराचा दर्जा दिल्यानंतर बिनविरोध निवडणूक ही संकल्पनाच अस्तित्वात रहात नाही असे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. निवडणूक अधिसूचना जारी होताक्षणीच नोटा हा काल्पनिक उमेदवार म्हणून अस्तित्वात येतो. किमान एका उमेदवाराचा अर्ज वैध ठरताच आपोआप दोन उमेदवार अस्तित्वात येतात. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध जाहीर न करता नोटा व प्रत्यक्ष उमेदवार यांच्यात लढत व्हायला हवी.याप्रमाणे सुधारणा केल्यास बिनविरोध निवडणुकीचा विषयच शिल्लक राहणार नाही. मतदारांना सर्व उमेदवार नाकारण्याचा हक्क बजावता येईल. निवडणूक प्रक्रिया सुधारणेसाठी हे एक ऐतिहासिक आणि संपूर्ण देशासाठी पथदर्शी पाऊल ठरेल.

नोटाचाही फेरविचार व्हावानोटाला सर्वाधिक मते मिळाल्यास निवडणूक रद्द करून फेरनिवडणुकीची तरतूद आहे. मात्र त्यावेळी पहिल्या निवडणुकीतील सर्व उमेदवारांना पुन्हा अर्ज दाखल करता येत नाहीत. हरियाणा राज्य निवडणूक आयोगाने २०१८ मध्ये तसे निर्देश दिले आहेत. हाच नियम महाराष्ट्रातही लागू करावा असेही प्रा. मराठे यांनी म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Challenge to unopposed elections: Voters' right to reject candidates

Web Summary : Professor Narayan Marathe challenges unopposed elections, arguing they deny voters the right to reject all candidates via NOTA. He advocates for NOTA to be treated as a virtual candidate, ensuring voters' rights and election integrity, proposing reforms for fair elections.