शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत सोमवारी संविधान मोर्चा, तयारी पूर्ण : सर्व संघटनांचा पाठींबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 13:44 IST

दिल्लीत संविधानाची प्रत जाळणाऱ्या संशयितावर कोणताही कारवाई केली नाही, याच्या निषेधार्थ सांगलीत येत्या सोमवार दि. १० सप्टेंबरला संविधान मोर्चा काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसांगलीत सोमवारी संविधान मोर्चा, तयारी पूर्ण सर्व संघटनांचा पाठींबा; मुले-मुलीही सहभागी होणार

सांगली : दिल्लीत संविधानाची प्रत जाळणाऱ्या संशयितावर कोणताही कारवाई केली नाही, याच्या निषेधार्थ सांगलीत येत्या सोमवार दि. १० सप्टेंबरला संविधान मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील सर्व संघटनांनी मोर्चास पाठींबा दिला आहे.लहान मुलेही मोर्चात सहभागी होणार आहेत, अशी माहिती संयोजकांनी शुक्रवारी दिली.प्रा. गौतमीपुत्र कांबळे, प्रा. बाबूराव गुरव, डॉ. संजय पाटील, सचिन सव्वाखंडे, उत्तम कांबळे, आशिष कोरी यांनी कष्टकऱ्यांची दौलत येथे पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. ते म्हणाले, विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून सकाळी अकरा वाजता मोर्चास प्रारंभ होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर होईल. कोणाचेही भाषण होणार नाही. पाच मुलींच्या शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांना निवेदन दिले जाईल.

मोर्चाच्या पुढे लहान मुली व महिला असतील. त्यांच्या मागे मुले व पुरुष, असा क्रम राहिल. अग्रभागी भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा व संविधाची प्रतिकृती असेल. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता होईल. मोर्चाच्या मार्गावर कोणतेही गैरकृत्य अथवा अस्वच्छता होऊ नये, याची काळजी घेतली आहे.ते म्हणाले, जिल्हास्तरावर हा मोर्चा निघत असला तरी लोकशाही, संविधान व सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी हा मोर्चा आहे. जोपर्यंत संविधान सुरक्षित आहे, तोपर्यंत लोकशाही व सर्व सामान्य माणूस सुरक्षित आहे.

मोर्चात कोणत्या घोषणा द्यायच्या, याचेही निजोजन केले आहे. मोर्चात असंविधान पद्धतीने वर्तणूक करणारा कोणी घुसल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांना केली आहे. संविधानाची प्रत जाळल्याचा जिल्हा परिषदेने त्यांच्या सभेत ठराव केला. तसाच ठरावा महापालिकेने १० सप्टेंबरला होणाऱ्या महासभेत करावा.काँग्रेसने सहभागी व्हावेप्रा. बाबूराव गुरव म्हणाले, इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने १० सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. सांगलीतही काँग्रेसने बंद व मोर्चाचे नियोजन केले आहे. काँग्रेसने कार्यकर्त्यांसह संविधान मोर्चात सहभागी व्हावे. यादिवशी मोर्चासाठी येणाऱ्या लोकांची वाहने अडवू नयेत, असे आवाहन गावपातळीवरील काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांना केले आहे.

टॅग्स :Morchaमोर्चाSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी