दाभोलकर, पानसरेंच्या हत्येमागे सनातनी

By Admin | Updated: November 14, 2015 00:07 IST2015-11-13T23:14:05+5:302015-11-14T00:07:53+5:30

भारत पाटणकर : आता कार्यकर्तेच करणार ‘कोम्बिंग आॅपरेशन’

Conspiracy behind the murder of Dabholkar, Panesar | दाभोलकर, पानसरेंच्या हत्येमागे सनातनी

दाभोलकर, पानसरेंच्या हत्येमागे सनातनी

आळसंद : डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी शासन यंत्रणेकडून पोलिसांवर दबाव आणला जात आहे. या मारेकऱ्यांना शोधून काढण्यासाठी चळवळीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची नावनोंदणी केली जाणार आहे. कार्यकर्त्यांच्यावतीने कोम्बिंग आॅपरेशन केले जाणार आहे. गुंड छोटा राजन सापडतो, मग दाभोलकर, पानसरे यांचे मारेकरी का सापडत नाहीत? असा संतप्त सवाल करून, डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंदराव पानसरे यांची हत्या सनातनी प्रवृत्तीनेच केली असल्याचा आरोप धरणग्रस्त चळवळीचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी गुरुवारी केला.
बलवडी-तांदळगाव (ता. खानापूर) येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. पाटणकर बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या इंदुताई पाटणकर होत्या.
डॉ. पाटणकर म्हणाले की, दाभोलकर, पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शोधून काढावे, या मागणीसाठी २१ ते २४ नोव्हेंबरदरम्यान पुणे-कोल्हापूर अशी संघर्ष यात्रा काढण्यात येणार असून त्या सहभागी व्हावे, असे आवाहनही डॉ. पाटणकर यांनी केले. ते म्हणाले की, खानापूर तालुक्यातील अग्रणी नदीचे जलयुक्त शिवार अभियानातून पुनरुज्जीवन होत आहे. त्याच पध्दतीने येरळा नदीचे होणार आहे. त्याची सुरुवात बळिराजा धरणापासून होणार आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी मान्यताही दिली आहे. शासनाच्या माध्यमातून येरळा नदीतील गाळ, जलपर्णी काढली जाणार आहे.
यावेळी बळिराजाचा खून करणाऱ्या वामनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. इंदुताई पाटणकर, संपत देसाई, गेल आॅम्वेट, अ‍ॅड. कृष्णा पाटील, जयंत निकम यांनीही मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास मोहनराव यादव, विलास चव्हाण, पांडुरंग चव्हाण, विक्रम चव्हाण, संदीप दुपटे, अनिल दुपटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मच्छिंद्र पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर रघुनाथ पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: Conspiracy behind the murder of Dabholkar, Panesar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.