जयंत पाटील यांच्याकडून पाटणकर कुटुंबीयांचे सांत्वन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:30 IST2021-08-28T04:30:37+5:302021-08-28T04:30:37+5:30
इस्लामपूर : कासेगाव (ता. वाळवा) येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, विचारवंत गेल ऑम्वेट ऊर्फ शलाका पाटणकर यांच्या स्मृतींना अभिवादन करून ...

जयंत पाटील यांच्याकडून पाटणकर कुटुंबीयांचे सांत्वन
इस्लामपूर : कासेगाव (ता. वाळवा) येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, विचारवंत गेल ऑम्वेट ऊर्फ शलाका पाटणकर यांच्या स्मृतींना अभिवादन करून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी त्यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर, त्यांची अमेरिकास्थित कन्या प्राची यांचे सांत्वन केले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, आटपाडीचे नेते भारत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अरुण कांबळे उपस्थित होते. जयंत पाटील आणि डॉ. पाटणकर यांनी आपल्या संवादात गेल ऑमवेट यांच्याविषयीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
फोटो :
ओळ : कासेगाव (ता. वाळवा) येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी डॉ. गेल ऑमवेट यांच्या स्मृतीस अभिवादन केले.यावेळी डॉ.भारत पाटणकर, प्राची पाटणकर, भारत पाटील,देवराज पाटील उपस्थित होते.