कोकरुडला मान्यवरांकडून देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:31 IST2021-09-04T04:31:42+5:302021-09-04T04:31:42+5:30

कोकरुड : कोकरूड (ता. शिराळा) येथे सरोजिनी शिवाजीराव देशमुख यांच्या रक्षाविसर्जनाचा विधी शोकाकुल वातावरणात पार पडला. मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली ...

Consolation to Deshmukh family from dignitaries to Kokrud | कोकरुडला मान्यवरांकडून देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन

कोकरुडला मान्यवरांकडून देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन

कोकरुड : कोकरूड (ता. शिराळा) येथे सरोजिनी शिवाजीराव देशमुख यांच्या रक्षाविसर्जनाचा विधी शोकाकुल वातावरणात पार पडला. मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी सत्यजित देशमुख, डॉ. शिल्पा देशमुख, फत्तेसिंगराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, रेणुकादेवी देशमुख, साईतेजस्विनी देशमुख, धैर्यशील देशमुख कुटुंबीय उपस्थित होते.

श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले, शिवाजीराव देशमुख यांना राजकीय वाटचालीत सरोजिनी देशमुख यांचा मोठा आधार होता. एक कुटुंब म्हणून त्यांनी कार्यकर्तींचा सांभाळ केला होता.

माजी उपसभापती आनंदराव पाटील, हणमंत गायकवाड, मंजूर फेडरेशनचे सर्जेराव देशमुख, युवराज सूर्यवंशी, डी. जे. पाटील, आनंदा भांदिगरे, प्रताप पाटील यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.

माजी आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार भगवानराव साळुंखे, युवानेते प्रतीक पाटील, हुतात्मा साखर चेअरमन वैभव नायकवडी, इस्लामपूर नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सी. बी. पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश पाटील, प्रताप पाटील, रणवीर गायकवाड, बाळासाहेब नायकवडी, संग्राम पाटील, स्वरूप पाटील आदींनी सत्यजित देशमुख यांची भेट घेऊन सांत्वन केले.

Web Title: Consolation to Deshmukh family from dignitaries to Kokrud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.