Congress will not bow down before BJP government's suppression: people will show their seats: Prithviraj Patil | भाजप सरकारच्या दडपशाहीपुढे काँग्रेस झुकणार नाही जनता त्यांना जागा दाखवून देईल : पृथ्वीराज पाटील
भाजप सरकारच्या दडपशाहीपुढे काँग्रेस झुकणार नाही जनता त्यांना जागा दाखवून देईल : पृथ्वीराज पाटील

सांगली - उत्तर प्रदेश सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरलेले आहे. सरकारचे हे अपयश उघडे पडू नये म्हणूनच प्रियंका गांधी यांना अटक करण्यातपर्यंत त्यांची मजल गेलेली आहे.अशा कोणत्याही दडपशाहीला भीक न घालता काँग्रेसचा अन्यायाविरोधातील लढा यापुढेही सुरूच राहील, असेही शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले. या वेळी कॉंग्रेस शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले, पोलिसांकडून सर्व पदाधिकारी यांना अटक करण्यात आली.

काँग्रेसच्या उत्तर प्रदेशमधील सरचिटणीस प्रियंका गांधी यांना सोनभद्रमध्ये पोलिसांनी केलेली अटक निषेधार्ह असून, भाजप सरकारने कितीही दडपशाही केली तरी त्यापुढे प्रियंका गांधी झुकणार नाहीत. भाजपाच्या या दंडेलशाहीविरोधातील लढा यापुढेही सुरूच राहील, असा इशारा सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिला आहे.  प्रियंका गांधी यांच्या अटकेवर संताप व्यक्त करून पाटील म्हणाले की, सोनभद्रमध्ये जमिनीच्या वादातून १० जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्या पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी प्रियंका गांधी जात असताना अटक करणे हे दडपशाहीचेच लक्षण आहे. पीडित लोकांना भेटण्यास आडकाठी करून भाजप सरकार काय साध्य करु इच्छित आहे? पीडितांना भेटणे काही गुन्हा आहे का? असे प्रश्नही पृथ्वीराज पाटील यांनी विचारले आहेत. 

भाजप सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा नेहमीच प्रयत्न करते. आज प्रियंका गांधी सोनभद्र येथे जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. सरकारच्या आदेशाशिवाय अशी अटक होऊच शकत नाही. प्रियंका गांधी या देशाला कणखर नेतृत्व दिलेल्या इंदिरा गांधी यांच्या नात आहेत. इंदिराजींनाही जनता पक्षाच्या राजवटीत अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्या डगमगल्या नाहीत. सरकारविरोधात संघर्ष करून त्यांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली, तोच वारसा प्रियंका यांच्याकडे आहे. भाजप सरकारने अडवणूक केली, प्रशासनाच्या आडून दडपशाही केली तरी अशा कोणत्याही दडपशाहीला त्या भीक घालणार नाहीत आणि डगमगणारही नाहीत, असे पाटील म्हणाले.

या वेळी आंदोलनत नगरसेवक मंगेश चव्हाण, जयदीप शिंदे, बिपीन कदम, अजित ढोले, भाऊसाहेब पवार, इरफान मुल्ला, सनी धोतरे, आयुब निशाणदार, चंद्रकांत पवार, पैगंबर शेख, विजय जाधव, नामदेव कस्तुरे, राजेंद्र कांबळे, अजित दुधाळ, अमित पारकर, योगेश राणे, सुधीर जाधव, मयुरेश पेडणेकर, अरुण पडसुळे, प्रसाद पाटील, शुभम बनसोडे, प्रमोद जाधव, सुशील गोटपगार, सचिन पाटील, सौराब साळुंके, विनायक कोळेकर, संग्राम चव्हाण, सचिन चव्हाण, प्रशांत ऐवले, हिरा कांबळे, प्रणिती पाटील, प्रदीप पाटील, सांगली शहर जिल्हा कॉंग्रेस व युवक काँग्रेस, सेवादल सर्व फ्रंटल पदाधिकारी उपस्थित होते.


Web Title: Congress will not bow down before BJP government's suppression: people will show their seats: Prithviraj Patil
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.