कडेगावच्या सात गावांत काँग्रेसचे सरपंच, उपसरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:27 IST2021-02-10T04:27:20+5:302021-02-10T04:27:20+5:30

तालुक्यातील शिरसगाव, सोनकिरे, शिवणी, कोतिज, कान्हारवाडी व येतगाव येथे काँग्रेसचे सरपंच व उपसरपंच झाले. रामापूर येथे सरपंच ...

Congress Sarpanch, Deputy Sarpanch in seven villages of Kadegaon | कडेगावच्या सात गावांत काँग्रेसचे सरपंच, उपसरपंच

कडेगावच्या सात गावांत काँग्रेसचे सरपंच, उपसरपंच

तालुक्यातील शिरसगाव, सोनकिरे,

शिवणी, कोतिज, कान्हारवाडी व येतगाव येथे काँग्रेसचे सरपंच व उपसरपंच झाले. रामापूर येथे सरपंच व उपसरपंचपदाच्या बहुमतासाठी काँग्रेसला भाजप राष्ट्रवादी आघाडीच्या तीन सदस्यांचा बिनशर्त पाठिंबा मिळाला. अंबक येथेही उपसरपंचपदासाठी काँग्रेसला भाजपच्या एका सदस्याचा पाठिंबा घ्यावा लागला. या दोन्ही गावांत काँग्रेसअंतर्गत गटबाजीचे दिसून आली. कडेगाव तालुक्यातील सोनकिरे येथे वंदना पाटील यांची सरपंचपदी, तर रायसिंग पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली.

शिरसगाव येथे सुप्रिया मांडके यांनी सरपंचपदी, तर किशोर पवार उपसरपंचपदी निवड झाली. रामापूर येथे शंकर माळी यांची सरपंच तर गणेश गवळी यांची उपसरपंच पदी निवड झाली.

शिवणी येथे संजय पवार यांची सरपंच, तर दत्तात्रय चव्हाण यांची उपसरपंचपदी निवड झाली. येतगाव वर्षा कणसे यांची सरपंचपदी, तर नीलेश सुतार उपसरपंचपदी निवड झाली. कान्हरवाडी येथे आकाश साळुंखे यांची सरपंचपदी, तर रोहिणी मदने यांची उपसरपंचपदी निवड झाली. कोतिज येथे सरपंचपदी करिष्मा पटेल यांची, तर उपसरपंचपदी अशोक जगताप यांची निवड झाली. अंबक येथे रोहित भानुदास जगदाळे यांची उपसरपंचपदी निवड झाली .

Web Title: Congress Sarpanch, Deputy Sarpanch in seven villages of Kadegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.