मिरजेत काँग्रेसचा ठराव : जयंत पाटील यांच्यावर नेत्यांचे टीकास्त्र
By Admin | Updated: June 11, 2016 01:27 IST2016-06-11T01:23:09+5:302016-06-11T01:27:49+5:30
मात्र काँग्रेस कार्यकर्ते अशा नेत्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत, असे माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी आ. जयंत पाटील यांचे नाव न घेता सांगितले.

मिरजेत काँग्रेसचा ठराव : जयंत पाटील यांच्यावर नेत्यांचे टीकास्त्र
मिरज : आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह सर्व निवडणुका राष्ट्रवादीशी आघाडी न करता स्वबळावर लढविण्याचा ठराव मिरजेत झालेल्या काँगे्रसच्या तालुका मेळाव्यात करण्यात आला. कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, गटा-तटाचे राजकारण करू नये, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. मदन पाटील यांच्या निधनामुळे तालुक्याबाहेरील नेत्यांचा, आपली डाळ शिजेल असा समज आहे. मात्र काँग्रेस कार्यकर्ते अशा नेत्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत, असे माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी आ. जयंत पाटील यांचे नाव न घेता सांगितले. मिरजेत राजपूत हॉलमध्ये तालुका काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सदाशिवराव पाटील, सत्यजित देशमुख, माजी मंत्री प्रतीक पाटील, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा शैलजा पाटील उपस्थित होते.
प्रतीक पाटील म्हणाले की, वसंतदादांचा सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मदन पाटील यांच्या निधनामुळे तालुक्याच्या नेत्यांचा, आपली डाळ शिजेल असा समज आहे. परंतु काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. भाजप शासनाकडून जनतेचा भ्रमनिरास झाल्यामुळे मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळले आहेत.
मोहनराव कदम म्हणाले की, काँग्रेस भांडणारा नव्हे, संस्कार असलेला हा पक्ष आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्यातील गटबाजी संपवावी. तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी स्वागत केले. पंचायत समिती सभापती जयश्री पाटील, अण्णासाहेब कोरे, सुभाष खोत, दिलीप बुरसे, सुभाष पाटील, सदाशिव खाडे, शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, वसंतराव गायकवाड उपस्थित होते. (वार्ताहर)