इस्लामपुरात इंधन दरवाढीसाठी काँग्रेसकडून मोदी सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:04+5:302021-06-09T04:34:04+5:30

इस्लामपूर : केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरामध्ये मोठी वाढ करून सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. या ...

Congress protests Modi government for fuel price hike in Islampur | इस्लामपुरात इंधन दरवाढीसाठी काँग्रेसकडून मोदी सरकारचा निषेध

इस्लामपुरात इंधन दरवाढीसाठी काँग्रेसकडून मोदी सरकारचा निषेध

इस्लामपूर : केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरामध्ये मोठी वाढ करून सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. या महागाईत जनता होरपळून गेली आहे, असा आरोप करत प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस ॲड. मनिषा रोटे यांनी मोदी सरकारचा निषेध केला.

शहर काँग्रेस आणि महिला काॅंग्रेसने पेट्रोल पंपावर आंदोलन करून या महागाईसाठी मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी रोटे यांच्यासह शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे, ॲड. अकिब जमादार, ॲड. आर. आर. पाटील, विनायक तांदळे, इंदूताई चौधरी, लता नवले, रचना शिंदे यांनी आंदोलनात सहभाग घेतला. रोटे म्हणाल्या, पेट्रोलने शंभरी पार केली तर गॅस ९०० रुपयांवर गेला आहे. या महागाईत सामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. शिंदे म्हणाले, मोदी सरकारने पेट्रोल व डिझेलच्या करामधून लाखो रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे.

फोटो : ०७ इस्लामपूर १

ओळ : इस्लामपुरात महिला आणि शहर काँग्रेसने इंधन दरवाढीवरून मोदी सरकारचा निषेध करणारे आंदोलन केले. यावेळी ॲड. मनिषा रोटे, राजेंद्र शिंदे, ॲड. अकिब जमादार, ॲड. आर. आर. पाटील उपस्थित होते.

Web Title: Congress protests Modi government for fuel price hike in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.