शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत इंधन दरवाढीविरुद्ध कॉंग्रेसची निदर्शने; केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 14:13 IST

सांगलीत कॉंग्रेस भवनासमोर ग्रामीण व शहर जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले.

सांगली : कोरोना संकटकाळात आर्थिक संकटांचा सामना करणा-या नागरिकांवर इंधन दरवाढीतून मोठा आर्थिक बोजा टाकल्याबद्दल केंद्र शासनाचा निषेध करीत कॉंग्रेसने सोमवारी सांगलीत धरणे आंदोलन केले. केंद्र शासनाच्याविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.सांगलीत कॉंग्रेस भवनासमोर ग्रामीण व शहर जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. कॉंग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नामदेवराव मोहिते, महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक व युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते.एका मोठ्या स्क्रीनद्वारे सकाळपासून देशभरातील इंधनदरवाढीविरोधातील संतापाचे चित्रीकरण दाखविण्यात येत होते. सकाळी ११ वाजता कॉंग्रेसने निदर्शने केली. ‘पेट्रोल, डिझेल दरवाढ करणा-या केंद्र शासनाचा धिक्कार असो’, ‘दरवाढ मागे घ्या, नाहीतर खुर्च्या खाली करा’, अशा घोषणा देत कॉंग्रेसने संताप व्यक्त केला.यावेळी पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड कमी असतानाही मोदी सरकार त्याचा लाभ सामान्य जनतेला देण्यास तयार नाही. कोरोनामुळे लोकांचे रोजगार गेले आहेत. उद्योग, व्यवसाय अजून पूर्वपदावर आलेले नाहीत. त्यात ही भाववाढ सामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे. दररोजच्या भाववाढीमुळे पेट्रोल प्रतिलिटर ९.१२ रुपये तर डिझेल ११.0१ रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे एक लिटर पेट्रोलला ८७ ते ८८ रुपये मोजावे लागत आहेत. काही राज्यांमध्ये डिझेल पेट्रोलपेक्षा जास्त महाग झाले आहे.आंदोलनात नगरसेवक संतोष पाटील, मनोज सरगर, शुभांगी साळुंखे, रवींद्र वळवडे, अ‍ॅड. मनिषा रोटे, फिरोज पठाण, रवीराज शिंदे, कय्युम पटवेगार, अमित पारेकर, आशिष चौधरी, कवठेमहांकाळचे अविराजे शिंदे, बाळासाहेब गुरव, आप्पासाहेब शिंदे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :congressकाँग्रेस