इस्लामपुरात केंद्राच्या कृषी विधेयकाविरोधात काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:06 IST2020-12-05T05:06:46+5:302020-12-05T05:06:46+5:30
इस्लामपूर : केंद्र सरकारने शेतकरी संघटनांना विचारात न घेता अन्यायी कृषी कायदा मंजूर केला आहे. त्यातून शेतकऱ्यांच्या मालाला शासनाकडून ...

इस्लामपुरात केंद्राच्या कृषी विधेयकाविरोधात काँग्रेसची निदर्शने
इस्लामपूर : केंद्र सरकारने शेतकरी संघटनांना विचारात न घेता अन्यायी कृषी कायदा मंजूर केला आहे. त्यातून शेतकऱ्यांच्या मालाला शासनाकडून मिळणारा हमीभाव रद्द केला आहे. बाजार समित्यांचे महत्त्व कमी केले आहे. याच्या निषेधार्थ इस्लामपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली.
वाळवा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. इस्लामपुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर वाळवा तालुका, इस्लामपूर शहर आणि महिला काँग्रेसच्यावतीने केंद्र शासनाच्या अन्यायी कृषी विधेयकाविरोधात निदर्शने करण्यात आली. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यावेळी पं. स. सदस्य आनंदराव पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे, आष्टा शहराध्यक्ष सुरेश पाटील, युवक काँग्रेसचे राजू वलांडकर, जयदीप पाटील, अॅड. सचिन पाटील, प्रमोद शिंदे, नीलेश जाधव, उदय थोरात, अर्जुन खरात, शंभुराजे थोरात, अक्षय फाटक, अनिल निकम उपस्थित होते.
फोटो ०३१२२०२०-आयएसएलएम-इस्लामपूर न्यूज
इस्लामपूर येथे काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी जितेंद्र पाटील, राजेंद्र शिंदे, आनंदराव पाटील, राजू वलांडकर, सुरेश पाटील उपस्थित होते.