इस्लामपुरात काँग्रेसची राजीव गांधींना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:24 IST2021-05-22T04:24:57+5:302021-05-22T04:24:57+5:30
इस्लामपूर : शहर काँग्रेसच्यावतीने देशाला माहिती व तंत्रज्ञानाची देणगी देणारे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना २१ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन ...

इस्लामपुरात काँग्रेसची राजीव गांधींना आदरांजली
इस्लामपूर : शहर काँग्रेसच्यावतीने देशाला माहिती व तंत्रज्ञानाची देणगी देणारे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना २१ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस मनीषा रोटे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष
राजेंद्र शिंदे, उपाध्यक्ष आकिब जमादार, आर. आर. पाटील, मानवाधिकार परिषदेचे विनायक तांदळे, अनिस मुल्ला यांच्याहस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
राजीव गांधी यांचे विचार आजच्या कार्यकर्त्यांनी आत्मसात करून काँग्रेसला तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन मनीषा रोटे यांनी केले. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर तसेच इम्युनिटी बुस्टरचे वाटप करण्यात आले. यावेळी पांडुरंग भांबुरे यांनी प्रास्ताविक केले. मुस्तफा मुल्ला, अब्बास पाकजादे, धनंजय पाटील, डी. टी. कुरळपकर, शादाब मुल्ला, जुबेर खाटीक उपस्थित होते.
फोटो ओळी
: इस्लामपूर शहर काँग्रेसच्यावतीने राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मनीषा रोटे, राजेंद्र शिंदे, आकिब जमादार उपस्थित होते.