काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मुस्लीम आरक्षणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:24 IST2021-03-15T04:24:45+5:302021-03-15T04:24:45+5:30
सामाजिक, शैक्षणिक, राज्यातील मुस्लिमांना आर्थिक, मागासलेपणा दूर करण्यासाठी राज्य सरकारने आरक्षण देणे गरजेचे आहे. अल्पसंख्याक पदाधिकारी ...

काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मुस्लीम आरक्षणाची मागणी
सामाजिक, शैक्षणिक, राज्यातील मुस्लिमांना आर्थिक, मागासलेपणा दूर करण्यासाठी राज्य सरकारने आरक्षण देणे गरजेचे आहे. अल्पसंख्याक पदाधिकारी काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी गेल्यानंतर मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याच्या आघाडी सरकारच्या आश्वासनाबाबत विचारणा होत आहे. सध्या राज्यात काँग्रेस व मित्र पक्षाचे सरकार असल्याने मुस्लीम समाजाला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. मुस्लीम आरक्षणाच्या मुद्यावर कार्यकर्त्यांना निरुत्तर व्हावे लागत असल्याने राज्य शासनाने मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याबाबत निर्णय घ्यावा. काँग्रेस पक्षालाही हे फायदेशीर ठरणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अल्पसंख्याक आघाडीचे वसिम रोहिले, हरीभाई मिस्त्री-नाईकवाडी, अकबर मोमीन, धनराज सातपुते, अनिकेत गायकवाड, देशभूषण पाटील, मनोज नांद्रेकर यांच्यासह अल्पसंख्याक कार्यकर्ते उपस्थित होते.