शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

काँग्रेसला भाजपची नव्हे, स्वकीयांची चिंता -गटबाजीचीही मोठी परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 00:42 IST

अविनाश कोळी । सांगली : विजयाच्या परंपरेबरोबरच सांगली जिल्ह्यातील काँग्रेसला गटबाजीचीही मोठी परंपरा आहे. परंपरेप्रमाणे सांगली लोकसभेच्या यंदाच्या निवडणुकीतही ...

ठळक मुद्देउमेदवारी कोणाला मिळणारयावर समीकरणे अवलंबून; कार्यकर्त्यांमध्ये असंतोष

अविनाश कोळी ।सांगली : विजयाच्या परंपरेबरोबरच सांगली जिल्ह्यातील काँग्रेसला गटबाजीचीही मोठी परंपरा आहे. परंपरेप्रमाणे सांगली लोकसभेच्या यंदाच्या निवडणुकीतही हीच गटबाजी उफाळून आल्याने काँग्रेसला भाजपऐवजी स्वकीयांचीच चिंता अधिक सतावू लागली आहे. ही जागा आणि उमेदवारी कोणाला मिळणार, यावरच या गटबाजीच्या तीव्रतेचे प्रमाण अवलंबून राहणार आहे.

सांगली लोकसभा निवडणुकीचा १९५२ पासूनचा इतिहास पाहिला, तर काँग्रेस याठिकाणी बहुतांशवेळा अपराजित राहिली आहे. तरीही गटबाजीचे काँग्रेसला लागलेले ग्रहण कधीही सुटलेले नाही. यापूर्वीचे हे ग्रहण खंडग्रास स्वरुपाचे होते, सद्यस्थितीत ते खग्रास स्वरुपाचे आहे. त्यामुळेच प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या पदरी अपयशाचा काळाकुट्ट अंधारच आला. महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्या अशा संस्थात्मक पडझडीचे दुखणेही काँग्रेसला त्यांच्याच गटबाजीमुळे सोसावे लागले. भाजपच्या गोटात या निवडणुका जिंकताना जितका आनंद व्यक्त होत होता, त्यापेक्षा अधिक आनंद स्वकीयांची जिरविल्याबद्दल काँग्रेसअंतर्गत अप्रत्यक्षपणे साजरा होत होता. गेल्या काही वर्षांतील काँग्रेसची वाताहत ही भाजपमुळे कमी आणि काँग्रेसच्या गटबाजीमुळेच अधिक झाल्याचे दिसून येते.

अपराजित राहण्याच्या बाबतीत महाराष्टÑात सर्वात अग्रेसर राहणारा हा मतदारसंघ मोदी लाटेत काँग्रेसच्या हातून निघून गेला, असे सांगितले जात असले तरी, त्याला गटबाजीची लाटही तितकीच कारणीभूत ठरली आहे. पक्षातील अनेक दिग्गज नेते काँग्रेस सोडून भाजप व अन्य पक्षात का गेले, याचा विचार कधीही काँग्रेसमध्ये झाला नाही. जाणाऱ्यांना न अडविण्याची भूमिका आणि सामान्य कार्यकर्त्यांना त्याच त्या पदावर ठेवण्याच्या वृत्तीने काँग्रेसचे राजकीय मैदानी खेळातील डावपेच संपुष्टात आले.

स्वकीयांची कशी जिरवायची किंवा पुढे पळणाऱ्यांचे पाय कसे ओढायचे, याचा सराव मात्र येथील नेत्यांनी सातत्याने केला. त्याचा फायदा वैयक्तिक नावाचा डंका वाजविण्यासाठी झाला, मात्र पक्षाची यात मोठी वाताहत झाली. आता पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आले असताना, व्यक्तिगत ताकद कुचकामी ठरू लागली आहे.पक्षाच्या अस्तित्वावर स्वत:चे अस्तित्व अवलंबून असते, या गोष्टीचा विसर काँग्रेसमधील बहुतांश लोकांना पडल्यामुळेच, पक्षाचा आलेख प्रगतीऐवजी अधोगतीच्या दिशेने जात राहिला. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.आता पुन्हा हा आलेख उंचावण्यासाठी काँग्रेसअंतर्गत गटबाजीचे ग्रहण संपुष्टात येणे आवश्यक आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही आता या गटबाजीसमोर हात टेकले असल्यामुळे, नेमके हे दुखणे बरे कसे होणार? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.वरिष्ठांच्या मनी साशंकतेचे ढगस्थानिक पातळीवरचा गोंधळ, गेल्या काही निवडणुकांमधील पक्षांतर्गत कुरघोड्यांचे राजकारण याचा अनुभव प्रदेश व केंद्रीय नेत्यांना असल्याने, त्यांच्या मनात अजूनही येथील एकजुटीबद्दल साशंकतेचे ढग दाटले आहेत. ही जागा काँग्रेसकडे राहिली किंवा स्वाभिमानी पक्षाला दिली तरी, नेत्यांचे सूर जुळतील याची खात्री कोणालाही वाटत नाही.उद्ध्वस्त किल्ल्यासमोर ताकदीचे नाटकविरोधकांनी काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करून त्याठिकाणचे सिंहासनही काबीज केले आहे. हा किल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी एकवटण्याचे सूत्र स्वीकारण्याऐवजी, याच किल्ल्यासमोर व्यक्तिगत बाहुबलाचे प्रदर्शन करून वर्चस्वाचा नाट्यप्रयोग काँग्रेसने रंगविला आहे. ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जाणार म्हटल्यानंतर, सक्षमतेचा ढोल वाजवित याच काँग्रेसच्या नेत्यांनी एकजुटीचे नवे नाट्यही यात घुसडले.

टॅग्स :SangliसांगलीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारणcongressकाँग्रेस