शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचे घोडे अडले

By admin | Updated: November 2, 2016 00:18 IST

जागा वाटप; नगराध्यक्षपदाचा तिढा : स्वबळाची भाषा, तरीही अकरा तारखेची प्रतीक्षा

 दत्ता पाटील ल्ल तासगाव तासगाव नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने स्वबळाचे रणशिंंग फुंकून लढण्याची तयारी केली आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीत अद्याप आघाडीची चर्चा सुरु आहे. दोन्ही पक्षांची आघाडीबाबत बैठक झाली असून, दोन जागांसाठी आघाडीचा पेच कायम असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून स्वबळ आजमावण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र अर्ज माघारीच्या तारखेपर्यंत (११ नोव्हेंबर) तोडगा निघून आघाडीची शक्यता नाकारता येत नाही, अशीदेखील चर्चा आहे. तासगाव नगरपालिकेच्या २१ जागांसाठी २१५ अर्ज दाखल झाले आहेत, तर नगराध्यक्षपदासाठी ३३ अर्ज दाखल झाले आहेत. भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनच पक्षांनी सर्व जागांवर उमेदवार उभा केले आहेत. शेकाप, शिवसेना, आरपीआय, स्वाभिमानी या पक्षांनी आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पॅनेल उभा करण्यात या पक्षांना अपयश आले आहे. अर्जांची छाननी दोन तारखेला होणार असून, अर्ज माघार ११ नोव्हेंंबर आहे. लढतीचे नेमके चित्र स्पष्ट होण्यासाठी ११ तारखेची वाट पाहावी लागणार आहे, हे स्पष्ट आहे. मात्र तत्पूर्वी पालिकेतील सत्ताधारी भाजपच्या विरोधात एकत्रित लढण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये खलबते सुरु असल्याची चर्चा आहे. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीपूर्वी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची आघाडीबाबत चर्चा झाली होती, मात्र जागा वाटपाबाबतचा तोडगा निघाला नसल्याने ही चर्चा लांबणीवर पडली. अर्ज माघारीच्या मुदतीपर्यंत दोन्ही पक्षांतून जागा वाटपाबाबतचा सन्मानजनक तोडगा निघाल्यास, दोन्ही पक्षांची आघाडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र तोडगा निघाला नाही, तर तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. पालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून भाजपला लक्ष्य केले जात होते. खासदार संजयकाका पाटील यांच्याविरोधात दोन्ही पक्षांचा सूर जुळल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. त्यामुळे भाजपविरोधात आघाडीची खलबते सुरु झाली. मात्र जागा वाटपाबाबत समाधानकारक तोडगा निघाला नसल्याने आघाडीचा निर्णय अधांतरी राहिला आहे. जागा वाटपाबाबत आमदार सुमनताई पाटील आणि आमदार पतंगराव कदम यांची चर्चा सुरु असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगितले जात आहे. त्यामुळे ऐनवेळी अर्ज माघारीच्या क्षणापर्यंत आघाडीची शक्यता होऊ शकते. दोन्ही पक्षांकडून सन्मानजनक तोडगा निघाला नाही, तर मात्र तिरंगी लढत पाहायला मिळणार, हे नक्की. आघाडीसाठी काँग्रेसला नगराध्यक्षपद आणि निम्म्या जागा असा फॉर्म्युला ठेवण्यात आला होता. मात्र राष्ट्रवादीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. राष्ट्रवादीने दिलेले उमेदवार कमकुवत आहेत. त्यांनी मोकळ्या जागा भरण्याचे काम केले आहे. पालिकेचा अभ्यास असलेला एकही सक्षम उमेदवार राष्ट्रवादीकडे नाही. याउलट काँग्रेसकडे अभ्यासू आणि अनुभवी उमेदवार आहेत. त्यामुळे आघाडी करुन राष्ट्रवादीचे घोंगडे गळ्यात घेण्यापेक्षा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. - महादेव पाटील तालुकाध्यक्ष, काँग्रेस काँग्रेससोबत आघाडीच्या अनुषंगाने अर्ज दाखल करण्यापूर्वी बैठक झाली होती. राष्ट्रवादीसाठी नगराध्यक्षपद आणि सोळा जागा आणि काँग्रेसला उपनगराध्यक्षपद आणि पाच जागा बाबत चर्चा झाली होती. काँग्रेसकडून या फॉर्म्युल्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आघाडीत पेच निर्माण झाला आहे. आता वरिष्ठ पातळीवर नेत्यांच्यात बोलणी सुरु आहेत. सन्मानजनक तोडगा निघाल्यास आघाडी होऊ शकते, अन्यथा स्बबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. - अमोल शिंंदे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी.