Congress' leadership is deprived of 'deprived' | काँग्रेसची आघाडी ‘वंचित’मुळं वंचित
काँग्रेसची आघाडी ‘वंचित’मुळं वंचित

श्रीनिवास नागे।
सांगली : संजयकाका पाटील यांनी लोकसभेची मॅच पुन्हा एकदा मारली. सांगलीत भाजपचं कमळ घट्ट रूजल्याचं तर दिसलंच, पण काकांचा गट मजबूत असल्याचंही सिद्ध झालं. पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरच्या विरोधकांना गार करत काकांनी हुकुमत दाखवून दिली. ‘स्वाभिमानी’ची बॅट घेऊन ऐनवेळी मैदानात उतरलेल्या विशाल पाटील यांनी काकांविरोधात तुफान फलंदाजी केली, पण वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकरांनी लक्षणीय मतं खात विशाल यांची दांडी गूल केली. काँग्रेस महाआघाडी विजयापासून वंचित राहण्यात ‘वंचित फॅक्टर’ कारणीभूत ठरला.
प्रभावी जनसंपर्क, प्रत्येक तालुक्यात स्वत:च्या कार्यकर्त्यांचं जाळं, केंद्र आणि राज्यातल्या सत्तेच्या आधारावर जिल्ह्यात आणलेला निधी, विरोधकांतल्या दुसऱ्या-तिसºया फळीशी जवळीक, दीड वर्षापासून सुरू असलेली निवडणुकीची तयारी, कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून सिंचन योजनांना दिलेली गती आणि या सगळ्यांचं ‘परफेक्ट मार्केटिंग’ हे संजयकाकांचे ‘प्लस पॉइंट’ ठरले.
काकांना उमेदवारी मिळू नये यासाठी पक्षांतर्गत विरोधकांनी लावलेली ‘फिल्डिंग’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोडून काढली. सांगलीची जबाबदारी काकांचे विरोधक महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर देऊन गुगली टाकली. विधानसभेच्या तिकिटाचा वायदा करत त्यांनी सगळी नेतेमंडळी काकांच्या प्रचारात उतरवली. काकांवर रूसलेले गोपीचंद पडळकर भाजपची जादा मतं खातील, असं दिसताच भाजपमधली धनगर समाजाची टीम सांगलीत आली. स्वत: मुख्यमंत्री दोनदा प्रचाराला आले.
पराभूत मानसिकतेतील काँग्रेसनं खमक्या उमेदवार नसल्याचं कारण देत ही जागा महाआघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली होती. मात्र त्यांच्याकडंही उमेदवार नव्हता. ऐनवेळी वसंतदादांचे नातू, काँग्रेसचे नेते विशाल पाटील ‘स्वाभिमानी’ची बॅट हातात घेऊन पिचवर उतरले. त्यामुळं किमान जिल्ह्यातील काँग्रेसचं आव्हान आणि अस्तित्व टिकून राहिलं. मॅचमध्ये रंगत आली. हा होता केवळ २३ दिवसांचा सामना! विशाल यांनी आक्रमक होत धुँवाधार बॅटिंग केली. सभा जिंकल्या. शरद पवारवगळता एकही मोठा नेता त्यांच्या प्रचारासाठी आला नव्हता. काँग्रेसच्या ‘हात’ या चिन्हाशिवाय लढणाºया विशाल यांच्यापुढं नवं चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान होतं. त्यांना राजू शेट्टींची साथ मिळाली. मात्र वेळ कमी पडला... अर्थात तेवढा वेळ त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांना पुरेसा होता!
जाता-जाता : केवळ संजयकाका पाटील यांना हिसका दाखवण्यासाठी उभ्या राहिलेल्या गोपीचंद पडळकरांनी लक्षणीय मतं घेतली. मात्र त्यांच्या या मतांचा फटका विशाल पाटील यांनाच जास्त बसला. धनगर समाजानं स्वत:चा उमेदवार म्हणून त्यांना बळ दिलंच, पण दलित-मुस्लिमांनीही पडळकरांची पाठराखण केली. ती मतं काँग्रेस आघाडीची म्हणजे विशाल पाटलांचीच होती ना!

या निकालाचा ऐतिहासिक संदर्भ
संजयकाका पाटील तसे पूर्वाश्रमीचे वसंतदादांचे पुत्र प्रकाशबापूंच्या गटाचे. काँग्रेस-राष्टÑवादी-भाजप असा प्रवास करणाºया काकांची राजकीय महत्त्वाकांक्षा मात्र दांडगी! मागील वेळी त्यांनी
भाजपमध्ये संजयकाकांच्या मित्रांपेक्षा विरोधकच अधिक. मुख्यमंत्र्यांनी दम देऊनही काकांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी पडळकरांना रसद पुरवली. दुसरीकडं सुरुवातीला तिकीट घेण्यास नकार देणाºया विशाल पाटील यांना काँग्रेस किंवा स्वाभिमानीचं तिकीट मिळू नये यासाठी दबावतंत्र वापरणाºया काँग्रेस-राष्टÑवादीच्या नेत्यांनीही पडळकरांनाच ‘हात’ दिला. पडळकर दोन लाखावर गेले.ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवलं आणि तत्कालीन खासदार प्रतीक पाटील यांना आस्मान दाखवलं. यंदा त्यांनी प्रतीक यांचे धाकटे बंधू विशाल यांना धूळ चारली.


Web Title: Congress' leadership is deprived of 'deprived'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.