शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची आता विधानसभेसाठी पेरणी, सांगलीत कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा 

By अशोक डोंबाळे | Updated: May 22, 2024 16:25 IST

मेळाव्याची सर्वच राजकीय पक्षांमध्ये रंगली चर्चा

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात उभारी आल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे काय होईल ते दि. ४ जूनला स्पष्ट होईल. पण, तोपर्यंत काँग्रेस पक्षासाठी तयार झालेल्या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी विधानसभेचे इच्छुक कामाला लागले आहेत. त्यातूनच सांगलीत सोमवारी सर्व काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा झाला. या मेळाव्याची सर्वच राजकीय पक्षांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.सांगली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाट्याची जागा उद्धवसेनेला गेली. उद्धवसेनेकडून चंद्रहार पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. पण, राज्यात महाविकास आघाडी असली तरी जिल्ह्यात आघाडीची बिघाडी झाली होती. महाविकास आघाडीकडून उमेदवारी डावलल्यामुळे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. उमेदवारी नाकारल्याच्या राजकारणामुळे विशाल पाटील यांच्या बाजूने पोषक वातावरण झाले. ग्रामीण भागातील काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रथमच जोश दिसून आला. काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांचा जोश आणि वसंतदादाप्रेमींची मोठी साथ विशाल पाटील यांना मिळाली. त्यामुळे तिरंगी असणारी लढत अपक्ष विशाल पाटील विरुद्ध भाजपचे खासदार संजय पाटील अशी झाली. या दुरंगी लढतीत कोण सांगलीचा खासदार होणार हे ४ जूनला ठरणार आहे. पण, त्यापूर्वी सांगली लोकसभा निवडणूक क्षेत्रात काँग्रेससाठी पोषक वातावरणाचा फायदा घेण्यासाठी विधानसभेचे इच्छुक मैदानात उतरले आहेत. सोमवारी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगलीत सर्व काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा घेतला. या कार्यकर्त्यांना स्नेहभोजनही यानिमित्ताने दिले. या स्नेहमेळाव्यास काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम, लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची विशेष उपस्थिती होती. या स्नेहमेळाव्यास सांगली विधानसभेच्या इच्छुक जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी जाण्याचे टाळल्याचे दिसून आले. काँग्रेसच्या या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही हजेरी लावली होती.

मदनभाऊ पाटील युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी फिरविली पाठपृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांचा स्नेहभोजन मेळावा सांगलीत आयोजित केला होता. या मेळाव्यास मदनभाऊ पाटील युवा मंच आणि मदनभाऊ गटाच्या कार्यकर्त्यांनी जाणे टाळल्याची चर्चा सांगलीत मंगळवारी रंगली होती. मदनभाऊ पाटील युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनीही आमच्या गटाचे कार्यकर्ते गेले नव्हते, असे स्पष्ट सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच काँग्रेसमध्ये गटातटाच्या राजकारणाला सुरुवात झाली की काय, अशी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी भूमिका व्यक्त केली.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाcongressकाँग्रेसVishwajeet Kadamविश्वजीत कदम