जतमध्ये काँग्रेसकडे ११; तर भाजपला नऊ ठिकाणी यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:27 IST2021-01-19T04:27:41+5:302021-01-19T04:27:41+5:30
जत : जत तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले असून, तेथे काँग्रेसकडून भाजपने सत्ता हस्तगत केली आहे. नऊ ग्रामपंचायतींमध्ये ...

जतमध्ये काँग्रेसकडे ११; तर भाजपला नऊ ठिकाणी यश
जत : जत तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले असून, तेथे काँग्रेसकडून भाजपने सत्ता हस्तगत केली आहे. नऊ ग्रामपंचायतींमध्ये भाजपला सत्ता मिळाली. तर सर्वाधिक करा ग्रामपंचायतींची सत्ता काँग्रेस पक्षाला मिळाली आहे. स्थानिक विकास आघाडीला नऊ ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळाली आहे.
काँग्रेसच्या वर्चस्वाखाली आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सिंगणहळ्ळी, मेंढेगिरी, येळदरी, गुगवाड, उंटवाडी, धावडवाडी, घोलेश्वर, सिद्धनाथ, शेड्याळ, मोरबगी, निगडी बुद्रुक यांचा समावेश आहे; तर उटगी, उमराणी, शेगाव, अंकले, सनमडी, लमाण तांडा (उटगी), गुड्डापूर, तिकोंडी, कुलाळवाडी येथे भाजपची सत्ता आली. स्थानिक विकास आघाडींना वळसंग, भिवर्गी, डोर्ली, अंकलगी, जाल्ह्याळ खुर्द, करेवाडी (तिकोंडी), कुडणूर, सोनलगी या नऊ ग्रामपंचायतींमध्ये यश आले.
आमदार विक्रम सावंत म्हणाले की, विजयी उमेदवारांनी करा ग्रामपंचायतींची माहिती दिली असली तरी प्रत्यक्षात काँग्रेस पक्षाकडे तालुक्यातील सोळा ग्रामपंचायती आल्या आहेत. तेथे निर्विवाद बहुमत स्थापन झाले आहे.
माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले की, मतमोजणी केंद्रातील विजयी उमेदवारांनी नऊ ग्रामपंचायतीत विजय संपादन केला असल्याची माहिती दिली असली तरी प्रत्यक्षात चौदा ग्रामपंचायती भाजपकडे आलेल्या आहेत. तेथील विजयी उमेदवार आमच्याकडे येऊन आम्हांला भेटून गेले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील म्हणाले की, तालुक्यातील तीस ग्रामपंचायतींमध्ये बत्तीस सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले आहेत. याशिवाय उंटवाडी, शेड्याळ, शेगाव या तीन ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत.
उटगी, शेगाव, डोर्ली, उमराणी, भिवर्गी या प्रमुख मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर होऊन येथील काँग्रेस पक्षाची सत्ता जाऊन तेथे भाजपची सत्ता आली आहे.
चाैकट
चिठ्ठी काढून विजयी घोषित
उंटवाडी व सिंगणहळ्ळी येथील प्रत्येकी एका उमेदवाराला समान मते पडली होती. तेथे लहान मुलाकडून चिठ्ठी काढून उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले. अंकलगी, भिवर्गी, वळसंग या तीन ग्रामपंचायतींमध्ये जनसुराज्य पक्षाचे काही सदस्य निवडून आले आहेत.
फोटो-१८जत१.२.३