भिलवडीसह परिसरात काँग्रेसचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:29 IST2021-01-19T04:29:04+5:302021-01-19T04:29:04+5:30

भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) आणि परिसरातील सहा ग्रामपंचायतींत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखालील काँग्रेस पक्षाने विजयाचा ...

Congress flag in the area including Bhilwadi | भिलवडीसह परिसरात काँग्रेसचा झेंडा

भिलवडीसह परिसरात काँग्रेसचा झेंडा

भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) आणि परिसरातील सहा ग्रामपंचायतींत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखालील काँग्रेस पक्षाने विजयाचा झेंडा फडकावला. प्रतिष्ठेच्या भिलवडी, माळवाडी, धनगाव, बुरुंगवाडी या चार गावात काँग्रेसने बाजी मारली, तर खंडोबाचीवाडी, भिलवडी स्टेशन या दोन्ही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. विरोधी भाजप व राष्ट्रवादीच्या स्थानिक आघाडीच्या हाती फारसे यश लाभले नाही.

भिलवडीमध्ये काँग्रेसने १३ जागा जिंकल्या, तर भाजप-राष्ट्रवादी युतीला चार जागा मिळाल्या. धनगावात काँग्रेसचे ६ उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादी, भाजप आघाडीला तीन जागा मिळाल्या. बुरूंगवाडी येथे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या स्थानिक पॅनेलने सात जागा जिंकल्या. माळवाडीत कॉंग्रेसप्रणित आप्पा जाधव जय हनुमान ग्रामविकास पॅनेलने १३, तर विरोधी भाजपच्या पॅनेलने दोन जागा जिंकल्या.

भिलवडी, माळवाडी, धनगाव या गावात

सत्तांतर झाले आहे. विजयी उमेदवारांची गावागावांत आतषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली.

फोटो - काँग्रेसच्या विजयानंतर भिलवडीचे नेते यशवंत पाटील व माजी जिल्हा परिषद

संग्राम पाटील यांनी डॉ. पतंगराव कदम व स्व. बाळासाहेबकाका पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

Web Title: Congress flag in the area including Bhilwadi