कडेगाव तालुक्यात सर्व ९ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:27 IST2021-01-19T04:27:36+5:302021-01-19T04:27:36+5:30
जिंकल्या आहेत. राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी येथे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. तालुक्यातील सोनकिरे, शिरसगाव, ढाणेवाडी आणि ...

कडेगाव तालुक्यात सर्व ९ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा
जिंकल्या आहेत. राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी येथे निर्विवाद वर्चस्व
प्रस्थापित केले.
तालुक्यातील
सोनकिरे, शिरसगाव, ढाणेवाडी आणि अंबक या चार गावांत काँग्रेसने
सत्ता कायम राखली तर रामापूर, कान्हारवाडी, कोतीज, शिवणी, येतगाव या पाच ग्रामपंचायतींत
सत्तांतर घडवून भाजपला जोर का झटका दिला. सोमवारी सकाळी १० वाजता कडेगाव तहसील कार्यालयात तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांच्या उपस्थितीत मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीला रामापूर ग्रामपंचायतीची मतमोजणी झाली. येथे ९ जागांपैकी ६ जागा मिळवीत काँग्रेसने परिवर्तन घडविले, तर भाजप, राष्ट्रवादी आघाडीला ३ जागांवर समाधान मानावे लागले.
ढाणेवाडी ग्रामपंचायतीत
सर्व ७ जागा मिळवत काँग्रेसने वर्चस्व कायम राखले. सोनकिरे येथे काँग्रेसच्या ३ जागा बिनविरोध झाल्या होत्या. निवडणूक झालेल्या ६ जागा
पैकी काँग्रेसने ३ जागा जिंकल्या तर राष्ट्रवादीने १ व भाजपने २ जागा
जिंकल्या. शिरसगाव येथे
काँग्रेस सर्व ९ जागा जिंकून सत्ता कायम
राखली. कान्हारवाडीत
काँग्रेसची एक जागा बिनविरोध झाली होती. अन्य सहापैकी ५ जागा काँग्रेसने जिंकल्या, तर १ जागा भाजपला मिळाली. अंबक येथे १० जागांवर विजय मिळवत काँग्रेसने सत्ता कायम राखली. तर भाजपला एक जागा मिळाली. येतगाव येथे काँग्रेसने १० तर भाजपने एक जागा जिंकली. शिवणी येथे काँग्रेसने सर्व ९ जागांवर विजय मिळविला. कोतिज येथे काँग्रेसने एक जागा बिनविरोध मिळविली होती. उर्वरित ६ पैकी ५ जागांवर काँग्रेस तर एका जागेवर भाजपने विजय मिळविला. निकाल जाहीर होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यानंतर सर्व विजयी उमेदवारांनी माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले.
फोटो-१८कडेगाव१
फोटो ओळ : ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या विजयानंतर कडेगाव येथे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.