कडेगाव तालुक्यातील नऊ गावांत काँग्रेस-भाजपचा संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:30 IST2021-01-08T05:30:04+5:302021-01-08T05:30:04+5:30

कडेगाव तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्‍या निवडणुकीसाठी अर्ज भरलेल्या ७४ जणांनी माघारी घेतली. ७९ जागांपैकी पाच जागा काँग्रेसने ...

Congress-BJP struggle in nine villages of Kadegaon taluka | कडेगाव तालुक्यातील नऊ गावांत काँग्रेस-भाजपचा संघर्ष

कडेगाव तालुक्यातील नऊ गावांत काँग्रेस-भाजपचा संघर्ष

कडेगाव तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्‍या निवडणुकीसाठी अर्ज

भरलेल्या ७४ जणांनी माघारी घेतली. ७९ जागांपैकी पाच जागा काँग्रेसने बिनविरोध मिळविल्या आहेत. आता ७४ जागांसाठी १७२ उमेदवार

निवडणूक रिंगणात आहेत. प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये

सामना रंगणार आहे.

तालुक्यातील शिरसगाव, सोनकिरे, अंबक, रामापूर, शिवणी, येतगाव, ढाणेवाडी, कान्हरवाडी, कोतीज या नऊ गावांमध्ये ग्रामपंचायतींचे धुमशान सुरू झाले आहे. शिरसगाव येथे नऊ जागांसाठी २२ उमेदवार

निवडणूक रिंगणात आहेत. येथे काँग्रेसची दोन पॅनेल एकमेकांसमोर आहेत. भाजपचे ३ उमेदवार आहेत.

सोनकिरे येथे ९ पैकी ३ जागा काँग्रेसने बिनविरोध मिळविल्या आहेत. अन्य ६ जागांसाठी ११ उमेदवार आहेत. येथे

भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी

आघाडी अशी लढत होत आहे. अंबक येथे ११ जागांसाठी २९ उमेदवार आहेत. तेथे काँग्रेस विरुद्ध भाजप सामना होत असला, तरी काँग्रेसमध्ये गटबाजीतून बंडाळी झाली आहे. रामापूर येथे ९ जागांसाठी १९ उमेदवार रिंगणात आहेत. येथे काँग्रेस विरुद्ध भाजप-राष्ट्रवादी आघाडी

निवडणूक लढवत आहे. शिवणी येथे ९ जागांसाठी १९ उमेदवार रिंगणात आहेत. येथे काँग्रेस विरुध्द भाजप असा सामना आहे. येथे राष्ट्रवादीची

काँग्रेसला साथ मिळत आहे. ढाणेवाडी येथे ७ जागांसाठी १४ उमेदवार

आहेत. येथे काँग्रेस व भाजप अशी सरळ लढत होत आहे. येतगाव येथे ११ जागांसाठी २९

उमेदवार मैदानात आहेत. येथे

प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत होत आहे. कान्हरवाडी येथे ६ जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात आहेत. एक जागा

काँग्रेसने बिनविरोध मिळविली आहे. येथे काँग्रेस आणि भाजप असा सामना होत आहे. कोतीज येथे

६ जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात

आहेत. काँग्रेसने एक जागा बिनविरोध मिळविली आहे. शिवसेनेचे येतगाव आणि रामापूर येथे

अनुक्रमे २ आणि १ उमेदवार मैदानात उतरले आहेत.

चौकट :

अंबक आणि शिरसगाव येथे बंडाळी

अंबक आणि शिरसगाव दोन्ही

गावात काँग्रेसची ताकद आहे. मात्र गटबाजीतून येथे काँग्रेसचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. याचा काही जागांसाठी

भाजपला फायदा होणार आहे.

Web Title: Congress-BJP struggle in nine villages of Kadegaon taluka