काँग्रेस, राष्ट्रवादीची लागणार कसोटी
By Admin | Updated: May 25, 2016 23:34 IST2016-05-25T23:00:16+5:302016-05-25T23:34:07+5:30
जिल्हा परिषद निवडणूक : भाजप, शिवसेना स्वतंत्र लढण्याच्या तयारीत

काँग्रेस, राष्ट्रवादीची लागणार कसोटी
अशोक डोंबाळे-सांगली अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वेध सदस्यांना लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांनी भाजप, शिवसेनेत प्रवेश केल्याने या दोन्ही पक्षांनी प्रथमच जिल्हा परिषद निवडणूक पक्षीय चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची निवडणुकीत कसोटी लागणार आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील जिल्हा म्हणून सांगलीकडे पाहिले जाते. येथे प्रत्येक तालुक्यातील राजकीय स्थिती वेगवेगळी आहे. यामुळे निवडणूक कोणतीही असो, ती रंगतदार होतेच. जिल्हा परिषदेत सध्या ६२ गट आणि दहा पंचायत समित्यांत १२४ गण अस्तित्वात आहेत. या गट आणि गणांच्या रचनेचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यांची संख्या कमी होणार नसली, तरी काही गावे एका गटातून दुसऱ्या गटात जाण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांसह सदस्य आपापल्या मतदारसंघात अधिकाधिक कामे नेण्याच्या प्रयत्नात आहेत. विशेष करून रस्ते, बंधारे, शाळा खोल्यांना अधिक मागणी आहे. यासह तीर्थक्षेत्र विकासाची कामे करण्यावर त्यांचा भर आहे. कामांच्या उद््घाटनाचा धडाका जिल्हाभर सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतून अनेक नेते भाजपमध्ये गेले असून, यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करून अनिल बाबर आमदार झाले आहेत. बाबर यांचे आटपाडी, खानापूर दोन्ही तालुक्यात वजन असल्यामुळे त्यांचे समर्थकही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसणार आहे. काँग्रेसलाही
जिल्हाध्यक्ष म्हणतात...
जिल्हा परिषदेत काँग्रेसला निश्चित चांगले यश मिळणार आहे. त्यादृष्टीने पक्षाची बांधणी केली जात आहे. काँग्रेस चिन्हावर निवडणूक लढविणार असून, कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीबरोबर आघाडी करणार नाही. कार्यकर्त्यांचा आघाडीस विरोध आहे. जिल्हा परिषदेवर काँग्रेसचाच झेंडा फडकणार आहे.
- मोहनराव कदम, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. यंदा भाजप सर्व जागा लढवण्याच्या तयारीत आहे. अन्य पक्षांतून भाजपमध्ये काही नेते आले आहेत. त्यामुळे भाजप मजबूत झाला आहे. या नेत्यांचा पक्षाला फायदा होणार आहे.
- पृथ्वीराज देशमुख, जिल्हाध्यक्ष, भाजप.
जिल्हा परिषदेत यंदा शिवसेना खाते खोलणार आहे. जिल्हाभर शिवसैनिकांचे जाळे तयार झाले आहे. याचा फायदा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये होणार आहे. यामुळे आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू आहे. ग्रामीण भागामध्ये बैठका घेऊन पक्ष मजबूत केला जात आहे.
- आनंदराव पवार, जिल्हाध्यक्ष शिवसेना.काही ठिकाणी अडचण निर्माण होणार आहे.