शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

सांगली लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 2:54 PM

लोकसभा निवडणुकीसाठी दि. २३ रोजी मतदान होणार आहे. मतदान संपण्याच्या अगोदर उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचार थांबवायचा असून, आयोगाच्या निर्देशाचे पालन करण्यात यावे. मतदानासाठीची सर्व ती तयारी प्रशासकीय पातळीवरून पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी रविवारी दिली.

ठळक मुद्देसांगली लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्जमतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरावर बंदी

सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी दि. २३ रोजी मतदान होणार आहे. मतदान संपण्याच्या अगोदर उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचार थांबवायचा असून, आयोगाच्या निर्देशाचे पालन करण्यात यावे. मतदानासाठीची सर्व ती तयारी प्रशासकीय पातळीवरून पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची तयारी व प्रशासकीय यंत्रणेच्या सज्जतेची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघात १२ उमेदवार निवडणूक लढवित असून, रविवारी सायंकाळी सहा वाजता प्रचाराची मुदत संपलेली आहे. त्यामुळे आता यापुढे मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांनी अथवा त्यांच्या समर्थकांनी प्रचार यंत्रणा राबवू नये. अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे.सांगली लोकसभा मतदारसंघात १८ लाख ३ हजार ५४ मतदार संख्या असून, त्यात ९ लाख २९ हजार २३२ पुरूष, तर ८ लाख ७३ हजार ७४९ स्त्री मतदार आहेत. मतदार संघातील १०३९ इमारतींमध्ये १८४८ मतदान केंद्रे आहेत. केंद्रांवर मतदानासाठी २१८५ मतदान यंत्रे, २२८४ सेंट्रल युनिट, तर २३२७ व्हिव्हीपॅट यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. टपाली मतदानासाठी १२ हजार ३२७ जणांनी अर्ज केला होता, सर्वांना टपाली मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत.

यात ६०५५ सैनिक आहेत, तर १२ हजार ३२७ निवडणूक कामकाजातील अधिकारी, कर्मचारी आहेत. मतदान प्रक्रियेत ८ हजार ५०५ कर्मचारी कार्यरत असून संपूर्ण जिल्ह्यासाठी ११ हजार ३३९ कर्मचारी आहेत. मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरावर बंदी असून याचे उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होईल. मतदानादिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली असून या दिवशीचे आठवडा बाजार, जत्रा, यात्रा पुढे ढकलले आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsangli-pcसांगली