मुख्याध्यापक शरद माळी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:19 IST2021-07-01T04:19:47+5:302021-07-01T04:19:47+5:30

इस्लामपूर येथील यशवंत हायस्कूलचे मुख्याध्यापक शरद माळी यांचा प्रा. आर.डी. सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी छायादेवी माळी, ...

Congratulations on the retirement of Principal Sharad Mali | मुख्याध्यापक शरद माळी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

मुख्याध्यापक शरद माळी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

इस्लामपूर येथील यशवंत हायस्कूलचे मुख्याध्यापक शरद माळी यांचा प्रा. आर.डी. सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी छायादेवी माळी, अ‍ॅड. चिमण डांगे, प्राचार्य डॉ. व्ही.जी. काळे उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : कासेगाव शिक्षण संस्थेच्या यशवंत हायस्कूल, इस्लामपूर येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद पांडुरंग माळी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आर.डी. सावंत, वाळवा पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी छायादेवी माळी, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. चिमणडांगे, कुसुमताई पाटील कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.जी. काळे उपस्थित होते.

सावंत म्हणाले, शरद माळी हे एक कर्तबगार मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांनी यशवंत हायस्कूलचा नावलौकिक उंचावला आहे. यावेळी प्राचार्य काळे, छायादेवी माळी, अ‍ॅड. चिमन डांगे, उत्तम सावंत, वैशाली हांडे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी गुरुदेव हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ए.ई. मुळे, मुख्याध्यापिका संगीता पाटील, पी.बी. श्रीखंडे, एस.एस. पाटील, डी.बी. सोनवले आदींची उपस्थिती होती. पर्यवेक्षिका एल.एस. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सी.ए. मलगुंडे व जे.बी. काळे यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Congratulations on the retirement of Principal Sharad Mali