सिग्नलवर वाहने उभी राहिल्याने कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:51 IST2021-03-04T04:51:21+5:302021-03-04T04:51:21+5:30

सांगली : येथील कॉलेज कॉर्नरवरील सिग्नल मोडून ट्रक व अन्य अवजड वाहने रस्त्याच्या मध्येच येऊन थांबल्याने वाहतुकीची कोंडी झाली. ...

Congestion due to vehicles standing on the signal | सिग्नलवर वाहने उभी राहिल्याने कोंडी

सिग्नलवर वाहने उभी राहिल्याने कोंडी

सांगली : येथील कॉलेज कॉर्नरवरील सिग्नल मोडून ट्रक व अन्य अवजड वाहने रस्त्याच्या मध्येच येऊन थांबल्याने वाहतुकीची कोंडी झाली. हा प्रकार बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता घडला. चौकात वाहतूक पोलीस असताना त्यांच्यासमोर ही वाहने सिग्नल तोडून पुढे येत असतानाही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

विद्युतपुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : वसंतदादा कारखाना परिसर, शिवोदयनगर, लक्ष्मीनगर येथे बुधवारी सकाळी काही काळ विद्युतपुरवठा खंडित झाला होता. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने अचानक विद्युतपुरवठा खंडित करण्यात येऊ नये. तांत्रिक बिघाडामुळे पुरवठा खंडित झाल्यास तो तातडीने पूर्ववत करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

ड्रेनेजचे काम पुन्हा थांबले

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शिवोदयनगर परिसरात ड्रेनेजसाठी सर्व रस्ते एकाचवेळी खोदल्याने नागरिकांना अर्धा किलोमीटर अंतरावर वाहने लावून घर गाठावे लागत आहे. मंदगतीने काम सुरू असून, ठेकेदाराकडील कामगार ५ ते ६ दिवस गायब असल्याने काम पूर्णपणे ठप्प आहे. या कारभाराकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

Web Title: Congestion due to vehicles standing on the signal