शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: काँग्रेस बंडखोर जयश्रीताईंच्या बैठकीत भूमिकेचा संभ्रम कायम, पाच दिवसांत निर्णय घेण्याचे कार्यकर्त्यांना आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:14 IST

'अफवांवर विश्वास ठेवू नका'

सांगली : येथील विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्रीताई पाटील यांनी बुधवारी कळंबी (ता. मिरज) येथील बैठकीत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. प्रत्येक कार्यकर्त्याशी व्यक्तिगत संवाद साधून भूमिका जाणून घेतली. पण, या बैठकीत जयश्रीताई यांनी राष्ट्रवादी की भाजप, याबाबत कोणतीच भूमिका जाहीर केली नाही. पाच दिवसांत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे आश्वासन त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.सांगली विधानसभा मतदारसंघात मदनभाऊ पाटील समर्थक कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. पण, विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न दिल्यामुळे कार्यकर्ते नाराज होते. कार्यकर्त्यांमुळे जयश्रीताई पाटील यांनी सांगली विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी केली होती. म्हणून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी जयश्रीताई पाटील यांची सहा वर्षांसाठी काँग्रेसमधून हकालपट्टी केली होती. त्यानंतर मदनभाऊ समर्थकांमध्ये उलट-सुलट चर्चा रंगली होती.आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही पक्षात प्रवेश करा, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी जयश्रीताई यांच्याकडे मांडली होती. यावर सर्वच कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी बुधवारी कळंबी येथे कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीस आजी-माजी नगरसेवक, काँग्रेसचे पदाधिकारी, मदनभाऊ युवा मंचचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जयश्रीताई यांनी प्रत्येक कार्यकर्त्याचे व्यक्तिगत मत जाणून घेतले. यावर काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, अशी सूचना केली. काही मोजक्याच कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेशाबद्दल भूमिका मांडली.सर्व कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर जयश्रीताई पाटील यांनी सर्वांशी मी बोलली आहे. आता पाच दिवस मला विचार करण्यासाठी वेळ द्या. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना पटेल अशीच भूमिका जाहीर करणार आहे, असा शब्द जयश्रीताईंनी कार्यकर्त्यांना दिल्या.

अफवांवर विश्वास ठेवू नका : जयश्रीताई पाटीलमी कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली आहे. माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या कार्याचा मान व सन्मान राहील अशीच भूमिका घेणार आहे. महापालिका क्षेत्राचा विकास डोळ्यासमोर ठेवून कोणत्या पक्षात जायचे ते निश्चित करण्यात येईल. कार्यकर्त्यांचे हित बघून निर्णय घेतला जाईल. तुम्ही सर्वांनी निश्चिंत राहा. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन जयश्रीताई पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणcongressकाँग्रेस