शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाड आरक्षणावरून सांगलीत परस्परविरोधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 10:54 IST

MuncipaltyCarporation, Sangli, School कुपवाड येथील सि. स. नंबर १९४ वरील प्लेग्राउंड व प्राथमिक शाळेचे आरक्षण उठविण्यावरून मंगळवारी सर्वपक्षीय कृती समिती व बाधित नागरिकांनी महापालिकेसमोर परस्पर विरोधी आंदोलन केले. सर्वपक्षीय कृती समितीचा आरक्षण उठवण्यास विरोध करीत धरणे आंदोलन केले, तर नागरिकांनी हे आरक्षण रद्द करावे, अशी मागणी करून निदर्शने केली.

ठळक मुद्देसर्वपक्षीय कृती समितीचे महापालिकेसमोर धरणे नागरिकांची समर्थनार्थ निदर्शने

सांगली : कुपवाड येथील सि. स. नंबर १९४ वरील प्लेग्राउंड व प्राथमिक शाळेचे आरक्षण उठविण्यावरून मंगळवारी सर्वपक्षीय कृती समिती व बाधित नागरिकांनी महापालिकेसमोर परस्पर विरोधी आंदोलन केले. सर्वपक्षीय कृती समितीचा आरक्षण उठवण्यास विरोध करीत धरणे आंदोलन केले, तर नागरिकांनी हे आरक्षण रद्द करावे, अशी मागणी करून निदर्शने केली.कुपवाड येथील दोन जागांवर प्लेग्राउंड व प्राथमिक शाळेचे आरक्षण आहे. या दोन्ही जागांवर नागरिकांनी गुंठेवारीअंतर्गत घरे बांधली आहेत. आरक्षण रद्द करण्याचा प्रस्ताव या १७ रोजी होणाऱ्या महासभेत घेण्यात आला आहे.

यापैकी प्लेग्राऊंडचे आरक्षण असलेली जागा १४० गुंठे इतकी आहे. त्यातील ४५ गुंठे जागेत घरे झाली आहेत. हे आरक्षण रद्द झाल्यास उर्वरित ९५ गुंठे भूखंडावर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे भूखंडांवरील आरक्षण उठवण्यात सर्वपक्षीय कृती समितीने विरोध करत महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले.या आंदोलनात माजी आमदार नितीन शिंदे, माजी नगरसेवक हणमंत पवार, गौतम पवार, सतीश साखळकर, नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, वि. द. बर्वे, ज्योती आदाटे, महेश खराडे, विकास मगदूम, शेरू सौदागर, युसूफ मिस्त्री, असिफ बावा, अविनाश जाधव, श्रीकांत शिंदे, आदिनाथ मगदूम, किरणराज कांबळे यांच्यासह सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते.

दरम्यान, आरक्षण भूखंडावर उभारलेल्या जिजामाता गृहनिर्माण संस्थेमधील रहिवाशांनी हे आरक्षण रद्द करावे, यासाठी महापालिकेसमोर निदर्शने केली. या आरक्षणामुळे ३७ घरे बाधित होत आहेत. शासनाकडून सर्वेक्षण होऊन आरक्षण रद्द करण्याची कारवाई सुरू आहे. महासभेत हा ठराव संमत करून शासनाकडे सादर करावा, अशी मागणी रहिवाशांनी केलीआंदोलनाला नगरसेवक विष्णू माने, राजेंद्र कुंभार, कल्पना कोळेकर, महेश सागरे यांच्यासह राजू सासणे, राजेंद्र आडमुठे, रशीद गौसेकर, गणपती मगदूम, विशाल पवार, नसीमा सय्यद, शोभा घाडगे, रंजना कागल, रामचंद्र साळुंखे, वैजयंता पवार यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSchoolशाळाSangliसांगली