शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Sangli: जमिनीच्या वादातून संघर्ष; मारहाणीत माजी सरपंचाचा मृत्यू, पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

By घनशाम नवाथे | Updated: January 18, 2024 13:54 IST

सांगली : कसबे डिग्रज (ता. मिरज) जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाण वेळी राष्ट्रवादीचे माजी सरपंच अण्णासाहेब दत्तू सायमोते (वय ५८, ...

सांगली : कसबे डिग्रज (ता. मिरज) जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाण वेळी राष्ट्रवादीचे माजी सरपंच अण्णासाहेब दत्तू सायमोते (वय ५८, आपटे मळा) यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय तपासणीत त्यांचा मारहाण वेळी हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी संशयित सुनील चव्हाण, संजय चव्हाण, विनायक चव्हाण, विशाल चव्हाण, विक्रम चव्हाण यांच्याविरूद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. मृत सायमोते यांचा मुलगा अविनाश याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दानोळी (ता. हातकणंगले) येथील शुभम चव्हाण यांची गावातील जमीन संशयित संजय चव्हाण हा करत होता. एक वर्षापूर्वीच शुभम यानी सदरची २७ गुंठे जमीन विक्री करणार असल्याबद्दल मृत सायमोते यांना सांगितले होते. सायमोते यांनी संशयित संजय याला तो कसत असलेली जमीन विकत घेण्याचा प्रस्ताव आल्याचे सांगितले होते.

त्यानंतर सायमोते यांनी वकील मार्फत जमीन कसणाऱ्या संजय याला व त्याच्या भावांना जमीन खरेदी करणार असून हरकत असल्यास सांगण्याबाबत नोटीस पाठवली. नोटिसीला त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यानंतर २७ डिसेंबर रोजी खरेदीपत्र करून सायमोते यांनी जमीन खरेदी केली. त्यानंतर संशयित संजय व नातेवाइकांनी सातबारावर नोंद करण्यास तलाठी कार्यालयात हरकत घेतली होती.या प्रकारानंतर सायमोते हे सकाळी ९.३० वाजता बसस्थानक चौकात सुपर टेलर दुकानात कपडे घेण्यासाठी गेले होते. तेव्हा संशयित पाचजण तेथे आले होते. त्यांनी सायमोते यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच हाताने, बुक्क्यांनी मारहाण केली. काहीजणांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात सायमोते यांचा मुलगा अविनाश तेथे आला. वडिलांना सोडविताना त्यालाही मारहाण केली.

संशयित मारहाण करत असताना सायमोते हे खाली कोसळून बेशुद्ध पडले. तेव्हा मुलगा अविनाश, चुलतभाऊ सचिन सायमोतेे, नवनाथ सायमोते आदींनी त्यांना दुचाकीवरून गावात खासगी दवाखान्यात नेले. त्यांनी सांगलीत नेण्यास सांगितले. सांगलीत खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथून सिव्हिलमध्ये नेण्यास सांगितले. सिव्हिलमध्ये नेल्यानंतर ते मृत झाल्याचे सांगितले. शवविच्छेदनामध्ये सायमोते यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे सांगितले.दरम्यान अविनाश सायमोते याने दिलेल्या फिर्यादीवरून व वैद्यकीय अहवालानुसार संशयित संजय चव्हाणसह पाच जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. त्यांना ताब्यात घेतले. सहायक पोलिस निरीक्षक सुशांत पाटील तपास करत आहेत.

सिव्हिलमध्ये दोन गटात धक्काबुक्कीसायमोते यांना मारहाण केल्यानंतर संशयित ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास आले होते. तेथून ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले. तेथे सायमोते यांना आणल्यानंतर दोन गटात शिवीगाळ होऊन धक्काबुक्कीचाही प्रकार घडला. त्यामुळे सिव्हिल परिसरात गोंधळ उडाला होता.

गावात तणावाचे वातावरण

सायमोते यांचा मारहाण वेळी मृत्यू झाल्याचे समजताच गावात सायमोते यांचे नातेवाईक जमले होते. त्यांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला. गावात तणावाचे वातावरण होते. उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, ग्रामीणचे प्रभारी निरीक्षक अभिजीत देशमुख व पथकाने गावात भेट दिली. दोन्ही गटाशी चर्चा करून शांततेचे आवाहन केले. सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी