शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात शिवसेना-एकनाथ शिंदे गटात संघर्ष, प्रवेशासाठी ऑफर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 12:53 IST

शिंदे गटानेही आता सर्वच तालुक्यात गट वाढविण्यासाठी हालचाली गतिमान केल्या

सांगली : पक्षीय अस्तित्वासाठी राज्यासह जिल्हास्तरावरही शिवसेना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात संघर्ष सुरू झाला आहे. शिंदे गटातील राज्य व जिल्हास्तरीय नेत्यांनी शिवसेनेच्या सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना प्रवेशाच्या ऑफर दिल्या असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी तातडीने पक्षाकडे प्रतिज्ञापत्रे पाठविण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटानेही आता सर्वच तालुक्यात गट वाढविण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेला छुपा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.जिल्ह्यातील आमदार अनिल बाबर व जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेला धक्का बसला. खानापूर व इस्लामपूर मतदारसंघात शिवसेनेने पुन्हा पक्षीय बांधणी सुरू केली आहे. शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या लोकांना आपल्याकडेच ठेवण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांची धडपड सुरू आहे. त्याचवेळी या दोन्ही तालुक्यात शिंदे गटाने आपले प्राबल्य राखण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.जिल्ह्यातील अन्य तालुक्यात शिंदे गटाला अद्याप विस्तार करता आलेला नाही. त्यामुळे राज्यातील नेत्यांनी संबंधित तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. या गोष्टीस शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. या ऑफरचे परिणाम अद्याप दिसून आलेले नाहीत. तरीही शिवसेना व शिंदे गटात सध्या जोरदार रस्सीखेच सुरू झालेली आहे.

ऑफर काय आहेत?सध्याच्या पदापेक्षा मोठे पद, प्रभाग व संबंधित पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघातील विकासकामे करण्याची आश्वासने दिली जात आहेत. काहींना महामंडळे देण्याच्या बदल्यात पक्षात येण्याची ऑफर दिल्याचे सांगण्यात आले.

शिंदे गटातून सध्या आमच्या पदाधिकाऱ्यांना ऑफर येत आहेत, मात्र त्याला कोणीही बळी पडलेले नाही. दोन अपवादवगळता शिवसेना एकसंध आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांवर कोणताही दबाव नाही. दबाव आला तरीही कोणी बळी पडणार नाही. - संजय विभुते, जिल्हाप्रमुख शिवसेना 

इस्लामपुरातील माजी नगरसेविकेच्या पतीला झालेल्या मारहाणीच्या घटनेमागे आमच्या गटाचा काहीही संबंध नाही. ईश्वरपूरच्या नामकरणाच्या विषयावरून हा प्रकार घडला असावा. ज्या शिवसैनिकांना आमच्याकडे यायचे आहे त्यांनी यावे; मात्र ज्यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतच रहायचे आहे त्यांना तिथे राहण्याचे स्वातंत्र्य आहे. आम्ही कोणावरही जबरदस्ती केलेली नाही. - आनंदराव पवार, जिल्हाप्रमुख, एकनाथ शिंदे गट

टॅग्स :SangliसांगलीShiv Nadarशिव नाडरEknath Shindeएकनाथ शिंदे