शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘ईश्वरपूर’ नामांतरावरुन नेत्यांमध्ये रंगले वाक् युद्ध; जयंतरावांचा सरकारवर नाराजीचा सूर, मुख्यमंत्र्यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 18:46 IST

'नाव बदलून शहरातील समस्या सुटणार नाहीत'

अशोक पाटीलइस्लामपूर : इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याची शिफारस राज्य शासनाने केंद्र सरकारकडे नुकतीच केली आहे. यावर मतदारसंघातील लोकप्रतिनिधी या नात्याने आ. जयंत पाटील यांनी त्यांना विश्वासात न घेतल्याबद्दल शासनावर नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे ‘जयंत पाटील म्हणजे सरकार नव्हे’, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केल्याने दोघा नेत्यांत संघर्ष पेटला आहे.उरूण-इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर यावर आ. जयंत पाटील यांनी प्रथमच भूमिका मांडत नाराजी व्यक्त केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, नाव बदलून शहरातील समस्या सुटणार नाहीत. लोकल बॉडी अस्तित्वात नाही. उरूण-इस्लामपूरचा लोकप्रतिनिधी मी आहे, अनेक वर्षे मी येथून निवडून येत आहे. सरकारने माझा विचार घेतला पाहिजे, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंतरावांच्या टीकेवर उत्तर दिले. येथील जनतेची मागणी असल्याने ईश्वरपूर असे नामकरण करण्यात आले आहे. तुम्ही सरकार नाही, नामकरणाविषयी सरकारला विचारले पाहिजे, असा पलटवार फडणवीस यांनी केला आहे.

नामांतराचा नवा वाद काय आहे?इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर असे नामकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर शहराच्या नावापुढे असणाऱ्या उरूण या नावाच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे उरूण परिसरातील नागरिकांनी मोर्चा काढून उरूण-ईश्वरपूर असे नामकरण करावे, अशी मागणी केली आहे. उरूण परिसराला इतिहास आहे. पुरातन कागदपत्रांमध्ये उरूण शहराचा उल्लेख आढळतो. दोन्ही शहरे एकत्रित वसलेली असल्यामुळे जोड शहर म्हणून उरूण-इस्लामपूर अशीच ओळख शहराची आहे.

कधी मैत्री, कधी राजकीय संघर्षजयंत पाटील व देवेंद्र फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांत सातत्याने संवाद व भेट होत असल्याने जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगत आहे. जयंत पाटील यांनी ही अफवा असल्याचे स्पष्ट केले, तर दुसरीकडे फडणवीस यांनीही यावर स्पष्टीकरण देत पक्षाव्यतिरिक्त वेगळा संवाद असू शकतो, असे सांगितले होते. दोन्ही नेत्यांकडून मैत्रीव पक्षांपलिकडच्या नात्याचा उल्लेख केला गेला. मात्र वादाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर दोन्ही नेत्यांत वाक् युद्ध रंगले आहे.