संख प्रकल्पाच्या कालव्याचे काँक्रेटीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:31 IST2021-09-17T04:31:03+5:302021-09-17T04:31:03+5:30
संख : संख (ता. जत) येथील मध्यम प्रकल्पाच्या डावा व उजवा कालव्याचे १०० टक्के काँक्रेटीकरण करावे. तसेच कालव्यामधून पाणी ...

संख प्रकल्पाच्या कालव्याचे काँक्रेटीकरण करा
संख : संख (ता. जत) येथील मध्यम प्रकल्पाच्या डावा व उजवा कालव्याचे १०० टक्के काँक्रेटीकरण करावे. तसेच कालव्यामधून पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. ते तात्काळ थांबवावे. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, पूर्व भागातील संख मध्यम प्रकल्पच्या डाव्या व उजव्या कालव्यामधून पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे. परंतु दोन्ही कालवे नादुरुस्त आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते. गळतीमुळे कालव्या शेजारील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे काँक्रटीकरण करूनच पाणी सोडण्यात यावे.
निवेदनावर भिमाशंकर बिरादार, सिध्दगोंडा बिरादार, नागनाथ शिळीन, राजकुमार बिरादार यांच्या स्वाक्षरी आहेत.