नरवाड येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:07 IST2021-01-13T05:07:25+5:302021-01-13T05:07:25+5:30
५ जानेवारीपासून ११ जानेवारीपर्यंत मारुती मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडला. दरम्यानच्या काळात कृष्णा पाटील (ढालगाव), विठ्ठल सूर्यवंशी ...

नरवाड येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता
५ जानेवारीपासून ११ जानेवारीपर्यंत मारुती मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडला. दरम्यानच्या काळात कृष्णा पाटील (ढालगाव), विठ्ठल सूर्यवंशी (मल्लेवाडी), भिकाजी शिंदे (कासारवाडी), भीमराव खटावकर (शिंदेवाडी), गोपाळ वास्कर (पंढरपूर), आप्पासाहेब पाटील (शिरूर) आदींची कीर्तने झाली. सोमवारी भीमराव खटावकर (शिंदेवाडी) यांच्या काल्याच्या कीर्तनाने पारायणाची सांगता झाली.
याशिवाय संगीत भजन, प्रवचन, एकतारी भजन, काकड आरती आदी कार्यक्रम झाले. वारकरी संप्रदायाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.