शर्तींचे पालन करतो, व्यापारास परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST2021-05-31T04:20:16+5:302021-05-31T04:20:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिलवडी : सातत्याने होणाऱ्या टाळेबंदीमुळे व्यापारी वर्गाचे हाल सुरू आहेत. आम्ही कोरनाच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या अटी ...

शर्तींचे पालन करतो, व्यापारास परवानगी द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : सातत्याने होणाऱ्या टाळेबंदीमुळे व्यापारी वर्गाचे हाल सुरू आहेत. आम्ही कोरनाच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या अटी व शर्तींचे पालन करीत व्यापार सुरू ठेवतो. त्यास शासनाने परवानगी द्यावी, असे साकडे भिलवडी येथील व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे घातले.
भिलवडी ता. पलूस येथील कोविड सेंटरला मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी भेट दिली. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील, सचिव महेश शेटे यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या डॉ. कदम यांच्यासमोर मांडल्या. व्यवसाय सुरू करण्यासंदर्भातले निवेदनही डॉ. कदम यांना दिले.
व्यापारी संघटनेच्यावतीने भिलवडी कोविड सेंटरला दहा हजारांची मदत कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या हस्ते देण्यात आली. ग्रामपंचायतीचे उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांनी ती रक्कम स्वीकारली.
यावेळी रमेश पाटील, महेश शेटे, दिलीप कोरे, राजू तांबोळी, सचिन सावंत, सचिन नावडे, निसार इबुसे, बापू जगताप, कामिल मिर्झा, जावेद तांबोळी, दीपक पाटील आदी उपस्थित होते.
चौकट
व्यापार सुरू करण्याबाबत तोडगा काढू : विश्वजीत कदम
व्यापार बंद असतानाही पोटाला चिमटा काढून सामाजिक भावनेने दिलेल्या या मदतीबद्दल विश्वजीत कदम यांनी व्यापारी संघटनेचे आभार मानले. तसेच व्यापार सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळाशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासनही डॉ. कदम यांनी दिले.