चांदोली मत्स्यबीज प्रकल्पाचे काम पूर्णत्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:28 IST2021-02-24T04:28:26+5:302021-02-24T04:28:26+5:30
वारणावती : चांदोली धरणाच्या पायथ्याला सुमारे पाच कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या मत्स्यबीज प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येत आहे. ...

चांदोली मत्स्यबीज प्रकल्पाचे काम पूर्णत्वास
वारणावती : चांदोली धरणाच्या पायथ्याला सुमारे पाच कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या मत्स्यबीज प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येत आहे. चांदोलीच्या वैभवात भर टाकणाऱ्या मत्स्यबीज प्रकल्पाच्या कामाची पाहणी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केली.
जिल्हा वार्षिक नियोजन योजनेंतर्गत व माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी सुचवलेल्या या मत्सबीज प्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे चालले आहे.
या मत्सबीज प्रकल्पात चाळीस बाय वीस मीटरची तेरा तळी बांधण्यात आली आहेत. सूर्यकिरणांमुळे मत्सबीज नष्ट होऊ नये म्हणून कलर कोटेड शेड उभारण्यात येणार आहे. उपकरणे व इतर साहित्यासाठी स्वतंत्र इमारत उभी केली जात आहे. या प्रकल्पांतर्गत मत्स्यबीजाची पैदास करणे, त्यांचे पालनपोषण करणे आणि मोठ्या माशांची निर्मिती करून त्यांची देखभाल करणे, मत्स्यपिलांची साठवण करणे असे नियोजन या प्रकल्पात केले जाणार आहे.
यावेळी मत्स्यबीज सचिव अमर पाटील, वनसंरक्षक संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प समाधान चव्हाण, तहसीलदार गणेश शिंदे, विभागीय वनअधिकारी वन्यजीव कऱ्हाडचे महादेव मोहिते, कनिष्ठ अभियंता पी. के. सुर्वे, एम. ए. थोरात, तालुका अध्यक्ष सुखदेव पाटील, उपकार्यकारी अतुल केकरे, विश्वास नाईक, भाजपचे तालुका अध्यक्ष सुखदेव पाटील आदी उपस्थित होते.