शहरातील पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:38+5:302021-06-09T04:34:38+5:30
सांगली : महापालिका क्षेत्रात साथीचे आजार नियंत्रणात आणण्यासोबतच पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी ...

शहरातील पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा
सांगली : महापालिका क्षेत्रात साथीचे आजार नियंत्रणात आणण्यासोबतच पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी आरोग्य व बांधकाम विभागाच्या बैठकीत दिले.
यावेळी स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, शहर अभियंता संजय देसाई, नगर अभियंता आप्पा हलकुडे, आरोग्याधिकारी डाॅ. सुनील आंबोळे उपस्थित होते. शहरात आवश्यक ठिकाणी पावसाळी मुरूम टाकावा, साथीच्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी तणनाशकाची फवारणी करावी. क्राॅस पाईपलाईन टाकून पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करण्याची सूचनाही महापौरांनी केली. धोकादायक वृक्षांचा सर्व्हे करणे, मोठ्या गटारीची स्वच्छता करून कचऱ्याची विल्हेवाट लावणे, खराब चेंबरची झाकणे बदलणे, नालेसफाईचे काम वेळेत पूर्ण करून घेणे, प्रत्येक वाॅर्डात औषध फवारणी करणे, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त आदी विषयांवर महापौरांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
यावेळी सहाय्यक आयुक्त अशोक कुंभार, एस. ए. खरात, दत्तात्रय गायकवाड, आरोग्याधिकारी डाॅ. रवींद्र ताटे, अविनाश पाटणकर, अनिल पाटील, श्रीपाद जोशी उपस्थित होते.