जुनी धामणीत पंचनाम्याबाबत तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:28 IST2021-08-23T04:28:23+5:302021-08-23T04:28:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जुनी धामणी (ता. मिरज) येथील पूरग्रस्त नागरिकांच्या घर, शेतीच्या पंचनाम्यात जाणीवपूर्वक त्रास दिला जात ...

जुनी धामणीत पंचनाम्याबाबत तक्रारी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जुनी धामणी (ता. मिरज) येथील पूरग्रस्त नागरिकांच्या घर, शेतीच्या पंचनाम्यात जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्याकडे करण्यात आल्या. त्यानंतर पवार यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्यासह गावाला भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.
जुनी धामणीला महापूराचा मोठा फटका बसला आहे. शासनाच्या आदेशानंतर गावात पंचनामे सुरू झाले. पण पंचनामे करताना ग्रामस्थांना जाणिवपूर्वक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी पवार यांच्याकडे केल्या. त्यांनी तत्काळ जिल्हा परिषद अध्यक्षा कोरे यांच्याशी संपर्क साधला. पवार व कोरे यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करून आढावा बैठक घेतली. तालुका विस्तार अधिकारी, आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी, ग्रामविकास अधिकारी, सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते. पक्षपात न करता नागरिकांचे पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिले. लसीकरण, शाळेच्या इमारतीची पाहणी केली, बचत गटाच्या महिलांच्या समस्या जाणून घेतल्या.