विठलापूर ग्रामपंचायत कारभाराची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:20 IST2021-06-25T04:20:33+5:302021-06-25T04:20:33+5:30

दीपक सावंत यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायतीने सन २०१५ ते २०२० ...

Complaint of Vithalapur Gram Panchayat | विठलापूर ग्रामपंचायत कारभाराची तक्रार

विठलापूर ग्रामपंचायत कारभाराची तक्रार

दीपक सावंत यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायतीने सन २०१५ ते २०२० या पाच वर्षांच्या कालावधीत जाणीवपूर्वक मागासवर्गीय समाजाच्या विकासकामात दुर्लक्ष केले आहे. ग्रामपंचायतीने दलित वस्ती विकास योजनेअंतर्गत १५ टक्के फंडातून २१ हजार रुपयांची भांडी घेतल्याचे फक्त कागदोपत्री दाखवले आहे, तसेच सन २०१६-१७ मध्ये २१ हजार ८०० रुपये आड बुजवण्यासाठी खर्ची टाकलेले आहेत. मात्र, भांडी खरेदी केल्याचे व आड बुजवण्याचे काम प्रत्यक्षात केलेले नाही. सन २०१८-१९ मध्ये सौर दिव्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीने १५ हजार रुपये खर्ची टाकले आहेत. मात्र, ते काम प्रत्यक्षात केलेले नाही असे आरोप करून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Web Title: Complaint of Vithalapur Gram Panchayat