शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूरच्या उर्दू शाळेमध्ये कोटीच्या अपहाराची तक्रार, तिघांविरुद्ध फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 17:06 IST

एकमेकांकडे बोटे दाखवून हात झटकले

इस्लामपूर : शहरातील इस्लामपूर एज्युकेशन सोसायटी संचलित उर्दू हायस्कूलच्या विकासासाठी मिळालेल्या १ कोटी रुपयांच्या निधीचा अपहार केल्याच्या घटनेत मुख्याध्यापकांसह इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश येथील न्यायालयाने पोलिसांना दिले होते. त्यानुसार शुक्रवारी पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद केली.मुख्याध्यापिका आबेदा कोतकुंडे, संस्थेचे तथाकथित अध्यक्ष सैफ रफीक मुल्ला व सचिव मिनाज दिवाण अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. उर्दू हायस्कूल बचाव कृती समितीने या अपहाराबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा शिक्षणाधिकारी व पोलिसांकडे केली होती; मात्र या दोन्ही विभागांनी हा विषय त्यांच्या अखत्यारीतला आहे, असे सांगत एकमेकांकडे बोटे दाखवून हात झटकले होते.त्यामुळे शकील हारुण गोलंदाज यांनी येथील न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला होता. उर्दू हायस्कूलच्या विकासासाठी संस्थेच्या बॅँक खात्यावर  निधी होता; मात्र संस्थेच्या संचालक मंडळाचा खटला न्यायप्रविष्ट असल्याने संबंधित खात्यावरून व्यवहार करण्यास  धर्मादाय आयुक्त कार्यालयाने प्रतिबंध घातले होते; मात्र तरीसुद्धा  मुख्याध्यापिका आबेदा कोतकुंडे, अध्यक्ष सैफ मुल्ला आणि सचिव मिनाज दिवाण यांनी हा अपहार केल्याचा आरोप उर्दू हायस्कूल बचाव कृती समितीने केला होता.या दाव्याची सुनावणी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एन. जयस्वाल यांच्यासमोर झाली. यावेळी त्यांनी कलम १५६/३ अन्वये गुन्हा दाखल करून त्याचा तपास अहवाल अथवा दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करावे असे आदेश दिले आहेत.इस्लामपूर पोलिसांकडे तपासन्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी संबंधित तिघांविरुद्ध संस्थेच्या संचालक मंडळाचा खटला न्यायप्रविष्ट असताना येथील इस्लामपूर अर्बन बॅँकेमधील खाते पुन्हा कार्यरत करून फेब्रुवारी २० ते डिसेंबर २२  या कालावधीत एक कोटी रुपये रकमेचा अपहार करून फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. तपास इस्लामपुर पोलिस करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी