आष्ट्यात निकृष्ट रस्ताकामाबद्दल पालिकेकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:18 IST2021-02-05T07:18:50+5:302021-02-05T07:18:50+5:30

आष्टा : आष्टा शहरातील गांधीनगरमधील रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याप्रकरणी संबंधितावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक अर्जुन माने यांच्यासह ...

Complaint to the municipality about inferior road work in Ashta | आष्ट्यात निकृष्ट रस्ताकामाबद्दल पालिकेकडे तक्रार

आष्ट्यात निकृष्ट रस्ताकामाबद्दल पालिकेकडे तक्रार

आष्टा : आष्टा शहरातील गांधीनगरमधील रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याप्रकरणी संबंधितावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक अर्जुन माने यांच्यासह नागरिकांनी पालिकेकडे केली आहे.

आष्टा शहरातील गांधीनगरमधील जितेंद्र शिंदे यांचे घर ते माणिक लवटे यांचे घर या रस्त्याचे डांबरीकरण शनिवारी (दि. २३) सायंकाळी सातच्या दरम्यान संबंधित ठेकेदाराने सुरू केले. निकृष्ट दर्जाचे काम सुरू केल्याबद्दल नागरिकांनी प्रश्न विचारल्यानंतर उद्धट उत्तर मिळाल्याने नगरसेवक अर्जुन माने यांच्यासह जितेंद्र शिंदे, अनुप वाडेकर, दत्तात्रय कोळी, संतोष जाधव, सुरेश पाटील, रेहाना मुल्ला, सुशीलकुमार शाह, माणिक लवटे, तुकाराम हलगेकर, राजेंद्र मोहिते, दीपाली माने, विजय गायकवाड, सुरेश देवर्षी यांनी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण व आनंदा कांबळे, वर्षा खोत यांना निवेदन दिले.

फोटो:

आष्टा-गांधीनगर येथील निकृष्ट रस्ता कामाबद्दल पालिका अधिकारी आनंदा कांबळे व वर्षा खोत यांना निवेदन देताना अर्जुन माने, जितेंद्र शिंदे, अनिल कोळी.

Web Title: Complaint to the municipality about inferior road work in Ashta