शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यासह चौघांविरोधात फसवणुकीची तक्रार- तासगाव पंचायत समितीकडून अनुदानावर ट्रॅक्टरचे आमिष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 23:56 IST

अनुदानाच्या माध्यमातून कमी किमतीत ट्रॅक्टर मिळवून देतो, असे आमिष दाखवून मणेराजुरी येथील भाऊसाहेब धोंडीराम एरंडोले या शेतकºयाला सव्वाचार लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी संबंधित

ठळक मुद्देमणेराजुरीच्या शेतकऱ्याला पावणेचार लाखांना गंडा

तासगाव : अनुदानाच्या माध्यमातून कमी किमतीत ट्रॅक्टर मिळवून देतो, असे आमिष दाखवून मणेराजुरी येथील भाऊसाहेब धोंडीराम एरंडोले या शेतकºयाला सव्वाचार लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी संबंधित शेतकºयाने पंचायत समितीतील एका अधिकाºयासह अभिनव क्रांती या संस्थेच्या तिघांविरोधात तासगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अनुदानाच्या नावाखाली शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केलेला घोटाळा ‘लोकमत’मधून सर्वप्रथम उघडकीस आणण्यात आला होता.

पंचायत समितीतील रोजगार हमी विभागाचे तांत्रिक सल्लागार चेतन नांदणीकर, मालगाव (ता. मिरज) येथील सतीश भूपाल सनदी, राजू भूपाल सनदी आणि हेमंत भंडारी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.याबाबत भाऊसाहेब एरंडोले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पंचायत समितीतील तांत्रिक सल्लागार चेतन नांदणीकर यांनी अभिनव क्रांती या संस्थेकडून अनुदानावर ट्रॅक्टर मिळवून देतो, असे सांगितले होते. त्यासाठी सप्टेंबर २०१७ मध्ये १ लाख ७५ हजार रुपये रोख, तर २ लाख ५० हजार रुपये धनादेशाद्वारे, असे एकूण चार लाख २५ हजार रुपये देण्यात आले होते. ही रक्कम दिल्यानंतर ट्रॅक्टर देण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी आणि नांदणीकर यांच्याकडे तगादा लावला होता.

मात्र त्यांच्याकडून ट्रॅक्टर मिळाला नाही. त्याऐवजी २५ आॅक्टोबर २०१७ रोजी २ लाख ७५ हजार रुपयांचा धनादेश दिला. खात्यावर पैसे नसल्याने हा धनादेश बँकेत वठला नाही. त्यानंतर १० एप्रिल २०१८ रोजी एक लाख रुपयांचा धनादेश दिला. हा धनादेशही वठला नाही.

अनुदानावर ट्रॅक्टर देतो असे सांगून पावणेचार लाख रुपये घेतले. त्यानंतरही ट्रॅक्टर दिलाच नाही. त्याऐवजी पैसे परत देण्यासाठी दिलेले धनादेशही वठले नाहीत. त्यामुळे खोटे धनादेश देऊन आणि अनुदानावर ट्रॅक्टर देतो, असे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी वरील चौघांवर कारवाई करावी व पैसे परत मिळवून द्यावेत, अशी मागणी एरंडोले यांनी पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर यांच्याकडे तक्रारीद्वारे केली आहे.तासगावात दुसरी तक्रारअभिनव क्रांती संस्थेच्या पदाधिकाºयांविरोधात यापूर्वीही जत तालुक्यातील काही शेतकºयांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. आता तासगाव तालुक्यातील शेतकºयांकडूनदेखील तक्रार दाखल झाली आहे. एकाच शेतकºयाने तक्रार दिली असली तरी, तालुक्यासह जिल्ह्यात फसवणुकीची व्याप्ती मोठी आहे.

टॅग्स :SangliसांगलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी