रामपूरच्या सरपंचांविराेधात मारहाणीची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:40 IST2020-12-16T04:40:57+5:302020-12-16T04:40:57+5:30

जत : रामपूर (ता. जत) येथील सार्वजनिक रस्त्यावर विद्युत खांब रोवण्यासाठी रस्त्याच्या मधोमध खड्डा का काढला आहे, ...

Complaint of beating against Sarpanch of Rampur | रामपूरच्या सरपंचांविराेधात मारहाणीची तक्रार

रामपूरच्या सरपंचांविराेधात मारहाणीची तक्रार

जत : रामपूर (ता. जत) येथील सार्वजनिक रस्त्यावर विद्युत खांब रोवण्यासाठी रस्त्याच्या मधोमध खड्डा का काढला आहे, ताे कडेला का काढला नाही, असा जाब विचारला म्हणून चिडून जाऊन मंगेश सुदाम शिवशरण (वय ३०, रा. रामपूर) याला सरपंच रखमाबाई महादेव कोळेकर (वय ५०) व त्यांचा मुलगा तानाजी महादेव कोळेकर (२८) यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांच्याविरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली.

रामपूर ग्रामपंचायतीने गावाच्या मध्यभागी असलेल्या रस्त्यावर विद्युत खांब रोवण्यासाठी खड्डा काढला होता. रस्त्याच्या मधोमध खड्डा काढल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. तो खांब रस्त्याच्या कडेला खड्डा काढून घ्यावा, अशी सूचना सामाजिक कार्यकर्ते मंगेश शिवशरण यांनी सरपंच रखमाबाई कोळेकर व त्यांचा मुलगा तानाजी कोळेकर यांना केली. ‘तू आम्हाला सांगणारा कोण’ असे म्हणून या दोघांनी शिवशरण यांना मारहाण करून शिवीगाळ केली. याप्रकरणी त्यांच्याविरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अर्चना खांडेकर करत आहेत.

Web Title: Complaint of beating against Sarpanch of Rampur