नागपंचमीनिमित्त जिवंत साप पकडून प्रदर्शन करणाऱ्यांविरुद्ध तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:26 IST2021-08-15T04:26:49+5:302021-08-15T04:26:49+5:30

राज्यात नागपंचमी मोठ्या प्रमाणावर साजरी होते. या सणानिमित्त काही सर्पमित्र व गारुडी लोक पैसे कमावण्यासाठी जिवंत साप पकडून दात ...

Complaint against those who caught live snakes on the occasion of Nagpanchami | नागपंचमीनिमित्त जिवंत साप पकडून प्रदर्शन करणाऱ्यांविरुद्ध तक्रार

नागपंचमीनिमित्त जिवंत साप पकडून प्रदर्शन करणाऱ्यांविरुद्ध तक्रार

राज्यात नागपंचमी मोठ्या प्रमाणावर साजरी होते. या सणानिमित्त काही सर्पमित्र व गारुडी लोक पैसे कमावण्यासाठी जिवंत साप पकडून दात काढून, सापाचा अमानुष छळ करतात. घरोघरी जाऊन लोकांना साप दाखवून हळदी-कुंकू लावून पूजा करायला सांगतात. सापाला दूध पाजायला सांगून पैसे मागतात. दरवर्षी राज्यात असे प्रकार सुरु आहेत. साप दूध पित नाही व दूध पिल्याने सापाच्या जिवास धोका आहे. हळदी कुंकवातील रसायनामुळे सापाला त्रास होतो. समाजात अंधश्रद्धा पसरवून गारुडी व काही सर्पमित्र पैसे कमावत आहेत. जिवंत साप पकडून सापाचे खेळ, साप डांबून ठेवणे, प्रदर्शन करणे भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा आहे. यासाठी तीन ते सात वर्षांपर्यंत शिक्षा व १० ते २५ हजार रुपये दंड असल्याचे अ‍ॅड. बसवराज होसगौडर यांनी सांगितले.

Web Title: Complaint against those who caught live snakes on the occasion of Nagpanchami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.