शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सांगली-पेठ रस्त्यावरील वृक्षलागवडीबद्दल तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 13:23 IST

सांगली-पेठ रस्त्याच्या रुंदीकरणावेळी तोडण्यात आलेल्या सुमारे २५० वृक्षांच्या बदल्यात एक हजारावर वृक्ष लागवड करण्याचे बंधन असताना संबंधित ठेकेदारांनी या नियमाची पायमल्ली केल्याचे दिसत आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधितांना झाडे लावण्याबाबत तातडीने सूचना द्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिक जागृती मंचतर्फे देण्यात आला आहे.

ठळक मुद्देसांगली-पेठ रस्त्यावरील वृक्षलागवडीबद्दल तक्रारठेकेदारावर संताप : नागरिक जागृती मंचचे बांधकाम विभागाला पत्र

सांगली : सांगली-पेठ रस्त्याच्या रुंदीकरणावेळी तोडण्यात आलेल्या सुमारे २५० वृक्षांच्या बदल्यात एक हजारावर वृक्ष लागवड करण्याचे बंधन असताना संबंधित ठेकेदारांनी या नियमाची पायमल्ली केल्याचे दिसत आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधितांना झाडे लावण्याबाबत तातडीने सूचना द्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिक जागृती मंचतर्फे देण्यात आला आहे.मंचचे सतिश साखळकर यांनी यासंदर्भातील कोल्हापूर येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना यासंदर्भातील निवेदन दिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, सांगली-पेठ रस्त्याच्या दुरवस्थेवरून मंचने अनेक आंदोलने केली. या रस्त्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्याचे आंदोलन झाल्यानंतर त्याची दखल घेत शासनाने हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केला.

 रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असताना सुमारे अडीचशे झाडांवर कुऱ्हाड  कोसळली. महामार्ग कामासाठी निश्चित झालेल्या नियमावलीनुसार रुंदीकरण करणाऱ्या ठेकेदाराने तोडलेल्या झाडांच्या संख्येच्या पाचपट झाडे लावायला हवीत. ही झाडे लावल्यानंतर त्याच्या देखभालीची जबाबदारीही त्याच्यावर असते. असे असताना सांगली-पेठ या मार्गावर झाडांची लागवड झालेली कोठेही दिसत नाही.महाराष्ट्र शासन एकीकडे वृक्षलागवडीवर कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना त्यांच्याच काळात सांगली जिल्ह्यात ही अनास्था का? या मार्गावर यापूर्वी दुतर्फा मोठी झाडे होती. त्यामुळे हा रस्ता दाट सावलीचा व हिरवागार दिसत होता. रुंदीकरणानंतर तो पुन्हा तसाच करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते, मात्र तसे झालेले नाहीत.

विशेष म्हणजे वृक्षतोड आणि वृक्षलागवड याबाबतची माहिती ना सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे ना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे! दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखविताना दिसत आहेत. त्यामुळे तातडीने याप्रकरणी चौकशी करून ठेकेदाराकडून मोठ्या वृक्षांची लागवड करावी. मागणीची दखल न घेतल्यास आम्हाला पुन्हा वेगळ््या मार्गाने आंदोलन करावे लागेल, असा इशारा साखळकर यांनी दिला आहे.

टॅग्स :environmentवातावरणSangliसांगली