गोटखिंडीतील ‘त्या’ आत्महत्येबाबत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:20 IST2021-06-25T04:20:31+5:302021-06-25T04:20:31+5:30

आष्टा : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील भगवान पांडुरंग थोरात (वय ६५) यांनी आनंदा तुकाराम थोरात यांच्या त्रासाला कंटाळून ८ ...

Complaint about 'that' suicide in Gotkhindi | गोटखिंडीतील ‘त्या’ आत्महत्येबाबत तक्रार

गोटखिंडीतील ‘त्या’ आत्महत्येबाबत तक्रार

आष्टा : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील भगवान पांडुरंग थोरात (वय ६५) यांनी आनंदा तुकाराम थोरात यांच्या त्रासाला कंटाळून ८ जून रोजी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी तक्रार भगवान थोरात यांचे पुत्र सागर थोरात यांनी आष्टा पोलीस ठाण्यात दिली आहे. तसेच आनंदा थोरात यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

भगवान थोरात यांच्या घराशेजारी त्यांचे चुलत भाऊ आनंदा थोरात वास्तव्यास आहेत. या दोघांमध्ये शेतजमिनीच्या व घरजागेच्या कारणावरून न्यायालयात वाद सुरू आहे. याला कंटाळून दि. ८ जूनला मध्यरात्री भगवान थोरात यांनी घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आनंदराव थोरात यांनी शेतवाटणीच्या कारणावरून देत असलेल्या त्रासाला कंटाळून वडील भगवान थोरात यांनी आत्महत्या केल्याचे सागर थोरात यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मनोज सुतार अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Complaint about 'that' suicide in Gotkhindi