शिवजयंतीनिमित्त मिरजेत विद्यार्थांचे सामुदायिक सूर्यनमस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:19 IST2021-02-20T05:19:30+5:302021-02-20T05:19:30+5:30
संस्थेचे कार्यवाह संजय धामणगावकर, ए. के. देशपांडे, मुख्याध्यापिका विनया पाठक, दयानंद लांडगे, मंजिरी सोपल, मीनाक्षी देशपांडे, मानसी केळकर, ...

शिवजयंतीनिमित्त मिरजेत विद्यार्थांचे सामुदायिक सूर्यनमस्कार
संस्थेचे कार्यवाह संजय धामणगावकर, ए. के. देशपांडे, मुख्याध्यापिका विनया पाठक, दयानंद लांडगे, मंजिरी सोपल, मीनाक्षी देशपांडे, मानसी केळकर, देविका चिप्पलकट्टी यांच्यासह शिक्षक, शिक्षिका व पाचवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होते. स्फूर्तिदायक गीतांच्या व संगीताच्या तालावर सूर्यनमस्कार घालण्यात आले. विद्यार्थी व शिक्षकांचा फिटनेस वाढावा, यासाठी ऑनलाईन सुक्ष्म योग व ध्यान साधनेचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. हा उपक्रम कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात येणार असल्याचे संजय धामणगावकर यांनी सांगितले. क्रीडा विभागाच्या मंजिरी सोपल व हर्षदा बेडेकर यांनी संयोजन केले. तसेच शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापिका विनया पाठक यांनी आभार मानले.