नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:41 IST2021-02-23T04:41:10+5:302021-02-23T04:41:10+5:30

फोटो:- दुधोंडी येथे विकास कामांची पाहणी जे. के. बापू जाधव, सरपंच विजय आरबुने, सुधीर जाधव यांनी केली. दुधोंडी : ...

Committed to solving the problems of the citizens | नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द

फोटो:- दुधोंडी येथे विकास कामांची पाहणी जे. के. बापू जाधव, सरपंच विजय आरबुने, सुधीर जाधव यांनी केली.

दुधोंडी : पलूस तालुक्यातील दुधोंडी गावातील वसंतनगर येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक जे. के. बापू जाधव यांनी केले.

दुधोंडी (ता. पलूस) येथे गावातील वसंतनगर येथील वाॅर्ड क्र. ५ मधील विविध विकास कामांची पाहणी जाधव यांनी केली, यावेळी ते बोलत होते. यावेळी सरपंच विजय आरबुने, उपसरपंच रवींद्र नलवडे, भारती शिक्षण मंडळाचे सचिव मिलिंद जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष डॉ. नागराज रानमाळे, पलूस तालुका मार्केट कमिटी सभापती सुनील नलवडे प्रमुख उपस्थित होते.

जे. के. बापू जाधव म्हणाले की, दुधोंडीसारख्या गावाला महाराष्ट्र शासनाचा सुंदर गाव म्हणून पुरस्कार मिळाला आहे. ही केवळ नि:स्वार्थी भावनेने केलेल्या कामाची पोहोचपावती आहे.

सुधीर जाधव म्हणाले की, सत्ता असो किंवा नसो, आम्ही नेहमी समाजकार्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच कृष्णाकाठ उद्योग समूहाचे शिल्पकार जे. के. (बापू) जाधव यांच्या नेतृत्वाखाली दुधोंडीच्या विकास कामासाठी सदैव तत्पर राहून सहकार्य करू.

सरपंच विजय आरबुणे यांनी ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांची सविस्तर माहिती दिली. यावेळी रघुनाथ जाधव, शामराव देशमुख, अरविंद साठे, विकास भोसले, रामचंद्र भोसले, विजय मोहिते, गणेश साठे, राकेश केंगार, प्रवीण मोहिते, स्वप्नील साठे उपस्थित होते.

Web Title: Committed to solving the problems of the citizens